नराधम बापाकडून 16 वर्षीय मुलीचा विनयभंग

दारुच्या आहारी गेलेल्या बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर विनयभंग (Father molestation on daughters) केला आहे.

नराधम बापाकडून 16 वर्षीय मुलीचा विनयभंग
Follow us
| Updated on: Feb 27, 2020 | 11:31 AM

बुलडाणा : दारुच्या आहारी गेलेल्या बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर विनयभंग (Father molestation on daughters) केला आहे. ही धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बापाला अटक (Father molestation on daughters) केली आहे.

नराधम बापाने आपल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पिण्याचे पाणी आणण्याचा बहाना केला आणि घरात कुणी नसल्याचा फायदा घेत तिचा विनयभंग केला. तसेच हे वाईट कृत्य जर कुणाला सांगितले तर तुझ्या आईला जीवे ठार मारण्याची धमकीही या नराधमाने  दिली. यावेळी आरोपी वडिलांचे स्वत:वरील नियंत्रण सुटले असले तरी समाजमन सुन्न करणारी ही घटना आहे.

पिंपळगाव राजा येथून जवळच असलेल्या हिवरा खुर्द येथे आरोपी आपल्या नातेवाईकांकडे गेल्या काही दिवसांपासून तो परिवारासह मुक्कामी होता. दरम्यान त्याची पत्नी शेतात कामाला गेली असता घरात असलेल्या 16 वर्षीय मुलीसोबत अनैतिक कृत्य करण्याचा प्रयत्न त्याने केला. यावेळी तिने प्रतिकार केला असता तिला आणि तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी त्या आरोपी बापाने दिली.

नराधम बापाने तिच्यासोबत सोबत अत्याचार केला. घाबरलेल्या बलिकेला अत्याचार सहन न झाल्याने तिने पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात आपली फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला गती देत आरोपीला हिवरा खुर्द येथून अटक केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी बापावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित बालिका पारस जिल्हा अकोला येथे एक वर्षापासून भाड्याच्या खोलीत राहत असताना तेथे सुद्धा या नराधम बापाने अत्याचार केल्याचे तिने आपल्या जवाबात म्हटले आहे.

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.