अर्णव गोस्वीमांना फोन पुरवणारे 2 कर्मचारी निलंबित, अलिबाग तुरुंग प्रशासनाची कारवाई
इंटेरिअर डिझाईनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आरोपी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना क्वारटांईन सेंटरमध्ये फोन पुरवण्याऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

रायगड : इंटेरिअर डिझाईनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आरोपी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना क्वारटांईन सेंटरमध्ये फोन पुरवण्याऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. अलिबाग तुरुंग प्रशासनाने ही कारवाई केली. अर्णव गोस्वामींना 5 आणि 6 नोव्हेंबर दरम्यान मोबाईल फोन पुरवण्यात आल्याचा प्रकार घडला होता. याची गंभीर दखल घेण्यात आलीय (Alibaug Prison administration take action against Police employee who provide Mobile Phone to Arnab Goswami).
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णव गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा धोका लक्षात घेता नव्या आरोपींना तुरुंगात ठेवण्याआधी 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. हे क्वारंटाईन सेंटर नगरपालिका शाळेत होतं. याच दरम्यान काही कर्मचाऱ्यांनी गोस्वामी यांना मोबाईल फोन पुरवल्याचा आरोप होता. यानंतर अर्णव गोस्वामींच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता त्यांना अलिबागहून तळोजा जेलमध्ये हलवण्यात आलं होतं.
दरम्यान, अलिबाग तुरुंग प्रशासनाने क्वारटांईन सेंटर असलेल्या नगरपालिका शाळेत बंदोबस्तास असलेल्या 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई केलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. त्यामुळे पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी करण्यात आली. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना लगेचच तळोजा कारागृहात हलवण्यात आले.
खारघर येथील तळोजा कारागृहात क्वारंटाईन सेंटरची सुविधा आहे. याठिकाणी अर्णव गोस्वामी यांना ठेवण्यात आलं. हा परिसर तुरुंग प्रशासनाच्या देखरेखीखाली असल्याने याठिकाणी बाहेरील कोणतीही व्यक्ती अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आता अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे.
संबंंधित बातम्या:
अर्णव गोस्वामींना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा नाहीच, आजची रात्र शाळेत, उद्या पुन्हा सुनावणी
Arnab Goswami| हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्टात काय काय घडलं?
संबंधित व्हिडीओ :
Alibaug Prison administration take action against Police employee who provid Mobile Phone to Arnab Goswami