आशालता ताईंच्या जाण्याने आमची 35 वर्षांची नाळ तुटली, अलका कुबल यांना शोक अनावर

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले (Alka kubal reaction on veteran Actress Ashalata Wabgaonkar).

आशालता ताईंच्या जाण्याने आमची 35 वर्षांची नाळ तुटली, अलका कुबल यांना शोक अनावर
Follow us
| Updated on: Sep 22, 2020 | 8:51 PM

सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले (Alka kubal reaction on veteran Actress Ashalata Wabgaonkar). साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. या मालिकेत त्यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अलका कुबल यांना भावना व्यक्त करताना शोक अनावर झाला (Alka kubal reaction on veteran Actress Ashalata Wabgaonkar).

शेवटच्या क्षणी आशालता ताईंसोबत असणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्या गेल्या काही दिवसातल्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, ‘गेले पाच दिवस मी, माझे पती समीर आठल्ये आम्ही हॉस्पिटलमध्येच आहोत. गेल्या महिन्याभरापासून त्या आमच्यासोबत चित्रीकरण करत होत्या. नुकतंच आम्ही पडद्यावर दिसलो होतो. त्या खूप आनंदी होत्या, उत्साही होत्या. या वयातही त्यांचा अभ्यासूपणा बघण्यासारखा होता. सतत सीन वाचत राहणं, या सीनच्या पुढे-मागे काय आहे हे दिग्दर्शकाला विचारात राहणं, अशी वृत्ती हल्ली कुठे दिसत नाही. आर्टिस्ट येतात आणि आयत्यावेळी हातात स्क्रिप्ट घेऊन काम सुरु करतात. आशालताताईंचा हा गुण वाखाणण्याजोगा होता. स्वतःला संभाळणं, स्वतःची काळजी घेणं, अतिशय शिस्तबद्ध असं त्याचं आयुष्य होतं. त्यांना असा आजार होईल आणि ही महामारी त्यांना हेऊन जाईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.

हॉस्पिटलमध्ये आल्यावरही त्यांची प्रकृती स्थिर होती. अगदी आईच्या हक्काने त्या आमच्याकडून लाड पुरवून घेत होत्या. आम्हीही त्यांचे लाड पुरवत होतो. परंतु अचानक त्यांची प्रकृती खालावत गेली. ऑक्सिजन पातळी कमी कमी होत गेल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ‘माहेरची साडी’पासून ते अनेक मालिका, चित्रपटांच्या या 35 वर्षांच्या कालखंडात माय-लेकींप्रमाणे आमची नाळ घट्ट जुळली होती. अगदी प्रेमाने, हक्काने, मायेने आम्ही एकमेकींवर रागवायचो, रुसायचो. माझ्या आई आणि माझ्या मुलीच्या आजी होत्या त्या! आम्ही आता त्यांना नेहमीच मिस करणार आहोत. विशेष करून मालिकेच्या सेटवर! सगळे नियम पाळून आम्ही चित्रीकरण करत होतो. तरीही हा विषाणू कसा पसरला हे कळलंच नाही. एकूण २२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते आता सुखरूप आहेत. मात्र आम्ही आशालता ताईंना गमावलं.

रुग्णालयाच्या कोव्हिड विभागात त्यांना ठेवलं तेव्हा आम्ही केवळ काचेतून त्यांना बघू शकत होतो. त्यांच्या बेडजवळही एक काच लावलेली होती. त्या तिथून आमच्याशी बोलायच्या. कधी फोन करायच्या. मला राहावलं नाही, मी डॉक्टरांना म्हणाले, ‘आता मला आत जाऊ द्या. त्यांना भेटू द्या. मला काही लागण झाली तरी माझ्या वयामुळे तुम्ही मला यातून बाहेर काढू शकाल.’ त्यावेळी डॉक्टरांनी मला पीपीई कीट घालून आतमध्ये जाण्याची परवानगी दिली. पीपीई कीटमुळे त्यांनी मला ओळखलं नाही. डॉक्टर आले समजून त्या म्हणाल्या, ‘डॉक्टर खाली अलका कुबल बसल्या आहेत. त्यांना जरा बोलवता का?’. मग पीपीई कीट थोडा बाजूला करत त्यांना म्हणाले की, मी अलकाच आहे. त्यावर त्या आनंदी होऊन म्हणाल्या, अलका, तूच का.. मला भूक लागली आहे. आधी मला काही तरी भरव. त्यांच्या जवळ पुलाव होता. मी सात-आठ घास त्यांना भरवला, पाणी पाजलं.

त्या घरातल्यांवर काहीशा रागवल्या होत्या. माझं शेवटच सगळं तू आणि समीरनेच करायचं असं देखील त्या म्हणाल्या. त्यांच्या इच्छेचा मान राखून, सरकारी नियमांचे पालन करून आम्ही आज इथे साताऱ्यातच सगळे सोपस्कार आटोपले आहेत. इथले आटोपून आम्ही आजच मुंबईला रवाना होणार आहोत. चित्रीकरण सात दिवसांपूर्वीच थांबवलं आहे. पुन्हा पंधरा दिवसांनी आम्ही सगळ्या चाचण्या करून पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करू. या सगळ्यात आम्ही आशालताताईंना खूप मिस करू’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

संबंधित बातम्या :

…तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल : अमेय खोपकर

Ashalata Wabgaonkar | ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन, मालिकेच्या शुटींगदरम्यान लागण

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.