संडे स्पेशल- दुसऱ्या देशात घुसून ‘मोसाद’ काम कशी फत्ते करते?

इस्रायलने सैन्याच्या बाबतीत, देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत अधिक सक्षम होण्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

संडे स्पेशल- दुसऱ्या देशात घुसून 'मोसाद' काम कशी फत्ते करते?
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 3:25 PM

मुंबई : इस्रायल हा भारताचा सर्वात जवळचा मित्र देश आहे. या देशाने सैन्याच्या बाबतीत, देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत अधिक सक्षम होण्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेसनी जगाला सर्जिकल स्ट्राईकचं महत्त्व पटवून दिलं आहे. इस्रायल एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यांनी मिलिटरी इंटेलिजन्स काय असतं, कसं काम करतं, हेदेखील जगाला शिकवलं. एक कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाच्या नेतृत्वाच्या मते देशातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा हा आपला पहिला धर्म आहे. अशा परिस्थितीत मोसाद (Mossad) ही गुप्तचर संस्था सुरक्षेचा हा धर्म पूर्ण करण्यात कायम यशस्वी ठरली आहे. (all about Israels intelligence agency Mossad worlds top agency)

1949 मध्ये सुरुवात

मोसादची सुरुवात डिसेंबर 1949 मध्ये झाली आहे. त्यावेळी या गुप्तचर यंत्रणेला इंस्‍टिट्यूट फॉर को-ऑर्डिनेशन म्हटलं जात होतं. मोसाद ब्रिटिश काळात फिलीस्‍तीनमध्ये इस्रायली सेनेचं इंटेलिजन्स युनिट होती. इस्रायल बनण्यापूर्वी अनेक प्रकारच्या मिशन्स, स्पेशल ऑपरेशन्स आणि सीक्रेट डिप्लोमसीमध्ये सहभागी असणारे रीयूवेन शिलोह या इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख होते.

मोसाद ही इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा आहे. आंतराराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह यांना पुरून उरणारी ही लहानशा देशाची चिमूटभर संस्था असली, तरी तिच्या कारवाया जगद्व्यापी आहेत. आजूबाजूला असलेली अरब शत्रुराष्ट्रे व दहशतवादी अशा अनंत अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही मोसादनेच आतापर्यंत त्यांच्या मातृभूमीला तारले आहे. मोसादच्या कारवायांनी मोठमोठ्या महासत्तांनाही हिसका दाखवला आहे.

सुरुवातीच्या काळात बगदादमध्ये पिछेहाट

सुरुवातीच्या काळात या एजन्सीला ब्‍यूरोक्रेसीमुळे बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे या एजन्सीला कार्यान्वित होण्यासाठी सुमारे एक वर्ष वाट पाहावी लागली. 1951 मध्ये एजन्सीला एका लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता, इराकची राजधानी बगदादमध्ये इस्त्रायली हेरांचं बिंग फुटलं होतं. या घटनेत अनेक इस्त्रायली गुप्तचर अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

इसार हॅरेल यांचं यशस्वी नेतृत्व

शिलोह 1952 मध्ये निवृत्त झाले आणि त्यानंतर एजन्सीची जबाबदारी इसार हॅरेल यांच्याकडे आली. आज जी मोसाद उभी आहे, त्याचे श्रेय इसार यांना दिले जाते. 1952 ते 1963 पर्यंत इसार मोसादचे प्रमुख होते, जगभरात मोसादच्या अनेक यशस्वी ऑपरेशनचे त्यांनी नेतृत्व केलं आहे.

सर्वात शक्तीशाली गुप्तचर यंत्रणा

अरब देश आणि इस्रायलच्या इतर शत्री राष्ट्रांमध्ये मोसादचे अनेक इस्त्रायली गुप्त एजंट आहेत. मोसादने आतापर्यंत त्यांच्या कोणत्याही शत्रूला जीवंत सोडलं नाही, अशीच मोसादची ओळख सांगितली जाते. शत्रू राष्ट्रांमधील राजकारण्याला मारायचे असो, दुसर्‍या देशात अराजकता पसरवायची असेल किंवा सत्ता बदलणे असेल, अशा सर्व प्रकारच्या कामांमध्ये मोसादचे गुप्त एजंट सहभागी असतात. इतकेच नव्हे तर मोसादचे अनेक एजंट गुप्तपणे इतर देशांच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये कार्यरत असतात. मोसादचे एजंट अनेकदा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयए, एमआय 6 सोबत काम करतात. मोसादचे बहुतांश एजंट हे इस्त्रायली संरक्षण दलाचे (आयडीएफ) अधिकारी असतात.

बिल क्लिंटनही मोसादच्या मुठीत अडकले होते

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि व्हाइट हाऊसमधील इंटर्न मोनिका लेविन्स्की यांच्यातील संभाषण मोसादच्या एजंट्सनी रेकॉर्ड केले होते, असे सांगितले जाते. या रेकॉर्डिंगच्या जोरावर मोसादने बिल क्लिंटन यांना ब्लॅकमेल केलं होतं. मोसाद सायकोलॉजिकल वॉरफेयरमधील एक मास्टर आहे. मोसादचा सायकोलॉजिकल वॉरफेयर विभाग ठरवतो की, कोणत्या ऑपरेशनमधील गुप्त भाग मीडियामध्ये लीक करायचा, कोणती माहिती लोकांमध्ये पसरवायची, जेणेकरुन लोकांमध्ये, प्रामुख्याने शत्रू राष्ट्रांमधील जनतेमध्ये भीती निर्माण होईल.

हेही वाचा

‘आमच्या अण्वस्त्र वैज्ञानिकाच्या हत्येमागे इस्त्राईलचा हात’, ‘मोसाद’वरील इराणच्या आरोपाने खळबळ

असं काय घडतंय की, मित्र असलेल्या रशियाची पाकिस्तानशी जवळीक वाढतेय?

नायजेरियात पुन्हा नरसंहार, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पादरीचे अपहरण, 11 जणांची हत्या

तीन देश, कहाणी एक, आधी गायब, नंतर हत्या, इम्रान खान यांच्या मुस्कटदाबीचा नवा मार्ग

कंधार विमान अपहरणातील दहशतवाद्याची सुटका, पाकिस्तान न्यायालयाच्या आदेशाचं कारण काय?

(all about Israels intelligence agency Mossad worlds top agency)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.