Lockdown 5.0 : प्रवासासाठी परवानगीची गरज नाही, लॉकडाऊन 5 चे नियम आणि टप्पे कोणते?

कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत (Lockdown 5 guidelines) वाढवण्यात आला आहे. मात्र 8 जूनपासून कंटेन्मेंट झोनबाहेर अनेक मुभा देण्यात आली आहे.

Lockdown 5.0 : प्रवासासाठी परवानगीची गरज नाही, लॉकडाऊन 5 चे नियम आणि टप्पे कोणते?
Follow us
| Updated on: May 30, 2020 | 8:10 PM

Lockdown 5 नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात सुरु असलेला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत (Lockdown 5 guidelines) वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नियमावली जारी करत लॉकडाऊन पाचची घोषणा केली. कंटेन्मेंट झोनमधील नियम जसे आहेत तसेच राहतील, पण अन्य झोनमध्ये बरीच मुभा देण्यात आली आहे. 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन असेल. (Lockdown 5 guidelines)

हा लॉकडाऊन घोषित करताना केंद्राने राज्य सरकारकडे अधिक अधिकार दिले आहेत. आता राज्य किंवा जिल्ह्यांतील प्रवासासाठी परवानगीची गरज नाही. मात्र राज्यातील वाहतूक व्यवस्थांबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल. केंद्र सरकारने वाहतुकीबाबत निर्बंध हटवले आहेत.

रात्रीचा कर्फ्यू कायम रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आता कर्फ्यू असेल. यापूर्वी ही संचारबंदी संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत होती. शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांबद्दल निर्णय नंतर घेण्यात येईल.

कंटेनमेंट झोनबाहेर जवळपास सर्व उघडणार कंटेनमेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे.

पहिला टप्पा – 8 जूनपासून पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल उघडले जातील. मात्र यासाठी नियम आणि अटी लागू असतील.

दुसरा टप्पा – यामध्ये शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्था उघडल्या जातील. मात्र त्याबाबत राज्य सरकार आपल्या स्तरावर निर्णय घेतील. पालकांशी चर्चा करुन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. जुलै महिन्यात शाळा सुरु करण्याचा विचार आहे, मात्र त्याबाबत राज्य सरकारांनीच ठरवायचं आहे. त्यामुळे शाळा सुरु होणार की नाही हे जुलैमध्येच ठरेल.

तिसरा टप्पा – तिसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमाने, मेट्रो रेल्वे, सिनेमा थिएटर, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, बार आणि ऑडिटोरियम याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

कुठेही प्रवासासाठी परवानगीची गरज नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंटेन्मेंट झोन वगळता आता कुठेही प्रवास करता येणार आहे. त्यासाठी कोणत्याही परवानगीची किंवा ई-पासची गरज नाही. मात्र राज्य सरकारने त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. जिल्ह्यांमध्ये किंवा आंतरराज्य प्रवास करु द्यायचा की नाही हे राज्यांनी ठरवायचं आहे, मात्र केंद्राने या प्रवासाला परवानगी दिली आहे.

नव्या गाईडलाईन्सनुसार काय उघडणार? काय बंद?

1.कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार

2. कंटेन्मेंट झोनमध्ये 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन

3. रेड झोन बाहेर 8 जूनपासून मंदीर,मशिद धार्मिक स्थळं उघडणार

4. रेड झोन बाहेर 8 जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार

5. रेड झोन बाहेर  8 जूनपासून शॉपिंग मॉल्सनाही उघडण्याची परवानगी

6. राज्यांतर्गत वा राज्या-राज्यात सर्व दळणवळणावर बंदी नाही

7. कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही

8. दळणवळणासंबंधी राज्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार

9.प्रतिबंधित क्षेत्रे राज्येच ठरवणार

10.प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू

11.शाळा सुरु करण्यासंबंधी जुलैमध्ये निर्णय

12. राज्यांशी चर्चा करुन शाळांबाबत निर्णय घेणार

(Lockdown 5 guidelines)

संबंधित बातम्या 

LOCKDOWN 5.0 | देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, केंद्र सरकारकडून नियमावली जारी

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.