आलियाच्या वारंवार फोन आणि मेसेजने रणबीर वैतागला?

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट त्यांच्या अफेअरमुळे सध्या चर्चेत आहेत. दोघेही ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. दोघांचं अफेअर असल्याचं जवळपास कंफर्म आहे. पण या दोघांच्या रिलेशनशीपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जातंय. काही वृत्तांनुसार, आलिया आणि रणबीर यांच्या रिलेशनशीपमध्ये सगळं काही ऑल इज वेल नाही. आलियाच्या वारंवार फोन, मेसेज करण्याने रणबीर […]

आलियाच्या वारंवार फोन आणि मेसेजने रणबीर वैतागला?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट त्यांच्या अफेअरमुळे सध्या चर्चेत आहेत. दोघेही ब्रह्मास्त्र सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. दोघांचं अफेअर असल्याचं जवळपास कंफर्म आहे. पण या दोघांच्या रिलेशनशीपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जातंय.

काही वृत्तांनुसार, आलिया आणि रणबीर यांच्या रिलेशनशीपमध्ये सगळं काही ऑल इज वेल नाही. आलियाच्या वारंवार फोन, मेसेज करण्याने रणबीर वैतागला असल्याचं बोललं जातंय. आलियाला रणबीरचा वेळ हवाय. पण रणबीरला ही गोष्ट खटकत असल्याचं बोललं जातंय. कारण, तो सध्या व्यस्त आहे.

आलिया रिलेशनशीप पुढे वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय, जे रणबीरला पटलेलं नाही. आलिया आणि रणबीर यांच्या साखरपुड्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. शिवाय आलियाचं कपूर कुटुंबीयांमध्ये मिसळलेलंही पाहायला मिळालं होतं.

आलिया आणि रणबीर या रिलेशनशीपबाबत सीरियस असल्याचं सांगितलं जातं. आलिया कपूर कुटुंबीयांमध्य जाते. रणबीरचे वडील ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना भेटण्यासाठीही आलिया गेली होती. कपूर कुटुंबीयांनाही हे नातं पुढे नेण्याची इच्छा असल्याची चर्चा आहे.

नीतू कपूर यांनी मुलगा रणबीरला साखरपुड्यासाठी तयार केल्याचं बोललं जात होतं. पण आलिया आणि रणबीर सध्या लग्नाच्या मूडमध्ये नाहीत. आगामी सिनेमा ब्रह्मास्त्रसाठी दोघेही सध्या व्यस्त असून या सिनेमानंतर लग्नाचा विचार केला जाणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.