महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज, मॉल्स बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला (Corona virus School college closed) आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली (Corona virus School college closed) आहे. राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व शाळा, कॉलेज आणि मॉल्स बंद ठेवण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शिक्षण विभागाच्या पत्रकानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona virus School college closed) रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका आणि सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये या 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात याद्वारे सूचित करण्यात येत आहे.
Maharashtra government: All schools, colleges and other educational institutions to remain closed till March 31st. #coronavirus https://t.co/UCC0GNC5Ox
— ANI (@ANI) March 14, 2020
या सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा तसेच विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.
Maharashtra govt: All schools in urban areas of Maharashtra (all govt & pvt schools in jurisdiction of Nagar Panchayat, Nagar Palika, Mahanagar palika) to remain closed till 31st March. Only exams for class 10th, 12th, & University exams will be held as per schedule #coronavirus
— ANI (@ANI) March 14, 2020
त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता आणि खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित संस्था प्रमुखास देण्यात याव्यात, असेही सांगितले आहे.
राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायीक, यात्रा, धार्मिक, क्रिडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. नुकतंच यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोघेही दुबईतून आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 9 जण दुबईला गेली होती. यातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोघेही यवतमाळमधील आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूरनंतर यवतमाळमध्येही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.
नागपूरमध्ये आणखी एकाला कोरोनाची लागण
नागपुरात आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. नागपुरात आता एकूण चार कोरोनाग्रस्त रुग्ण झाले आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या नव्या रुग्णाला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Corona virus | चीन, इराणसह 7 देशांचा प्रवास करुन आलेल्यांसाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या सूचना
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच नागपुरात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यासोबत देशातीलही कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होऊन 84 झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली (Corona virus School college closed) आहे.