मुंबई : केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली असली, तरी रसिक चित्रपटगृहात जातील का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे अजूनही निर्मात्यांचा ओढा डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याकडेच दिसत आहे. ‘अॅमेझॉन प्राईम’वर नऊ नवे चित्रपट पुढील तीन महिन्यांत प्रदर्शित होणार आहेत. (Amazon Prime makes Big announcement global premiere of 9 movies)
अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ आणि विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’ नंतर अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या नव्या सिनेमांची घोषणा करण्यात आली आहे. हिंदीसह तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड या भाषांतील चित्रपट नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान प्रदर्शित होणार आहेत.
अजय देवगणची निर्मिती असलेला आणि राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला ‘छलांग’ 13 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर अक्षय कुमारची निर्मिती असलेला आणि भूमी पेडणेकरची प्रमुख भूमिका असलेला ‘दुर्गावती’ 11 डिसेंबरला रिलीज होईल.
डेविड धवन दिग्दर्शित आणि वरुण धवन-सारा अली खानची प्रमुख भूमिका असलेला ‘कुली नंबर 1’ चा रिमेक 25 डिसेंबर रोजी ‘अॅमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित होणार आहे.
Ab har sawari ke samaan aur entertainment ki responsibility hogi Coolie No. 1 ki, koi shaq? ???#WorldPremiereOnPrime #CoolieNo1OnPrime, coming Christmas 2020, @PrimeVideoIN#SaraAliKhan #DavidDhawan @vashubhagnani @jackkybhagnani @honeybhagnani @SirPareshRawal @poojafilms pic.twitter.com/gvpyyHkENl
— VarunDhawan (@Varun_dvn) October 9, 2020
कोणता चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
हलाल लव्ह स्टोरी (मल्याळम) – 15 ऑक्टोबर
भीमासेना नलामहाराजा (कन्नड) – 29 ऑक्टोबर
सूरारी पोट्टूरु (तामिळ) – 30 ऑक्टोबर
छलांग (हिंदी) – 13 नोव्हेंबर
माने नंबर 13 (कन्नड) – 19 नोव्हेंबर
मिडल क्लास मेलडीज् (तेलगू) – 20 नोव्हेंबर
दुर्गावती (हिंदी) – 11 डिसेंबर
मारा (तामिळ) – 17 डिसेंबर
कुली नंबर 1 (हिंदी) – 25 डिसेंबर
संबंधित बातम्या :
Unlock 5: चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जायचंय, मग ‘हे’ नियम वाचाच
अक्षय, अजय, आलियाचे चित्रपट ‘हॉटस्टार’वर, तब्बल 700 कोटींची डील
(Amazon Prime makes Big announcement global premiere of 9 movies)