आता अ‍ॅमेझॉनवरुन बुक करता येणार गॅस सिलेंडर

| Updated on: Nov 04, 2020 | 8:53 PM

आता तुम्हाला गॅस बुक करायचा असल्यास थेट अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. | Amazon

आता अ‍ॅमेझॉनवरुन बुक करता येणार गॅस सिलेंडर
Follow us on

नवी दिल्ली: घरगुती गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी आता ग्राहकांना आणखी सोपा पर्याय उपलब्ध होणार आहे. अलीकडच्या काळात ऑनलाईन शॉपिंगमुळे ओळखीच्या झालेल्या अ‍ॅमेझॉनच्या साईटवरुन ग्राहकांना गॅस बुक करता येईल. त्यामुळे गॅस एजन्सीला वारंवार फोन करण्याचे किंवा एजन्सीत खेटे घालण्याचे ग्राहकांचे कष्ट कमी होणार आहेत. (book gas Cylinders on Amazon)

अ‍ॅमेझॉन इंडियाने नुकताच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार केला आहे. त्यानुसार आता HP कंपनीचा सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना अ‍ॅमेझॉनवरुन पैसे भरुन सिलेंडर मिळवता येईल. त्यामुळे IVRच्या माध्यमातून गॅस बुक करण्याचे कष्ट वाचतील. त्यामुळे आता तुम्हाला गॅस बुक करायचा असल्यास थेट अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. गॅस बुक करण्यासाठी डिजिटल पद्धतीने पैसे अदा करता येतील. याशिवाय, अ‍ॅलेक्सा आणि फायर स्टिक या तंत्रज्ञानाच्या मदतीनेही ग्राहकांना सिलेंडर बुक करता येईल. मात्र, ही सोय केवळ अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असून तुर्तास त्याचा लाभ HP गॅस कंपनीच्या ग्राहकांनाच मिळेल.

अ‍ॅमेझॉनवरुन गॅस सिलेंडर कसा बुक कराल?

सिलेंडर बुक करण्यासाठी अ‍ॅमेझॉनवरील LPG कॅटेगरीवर क्लिक करावे. त्याठिकाणी तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा HP गॅसचा 17 अंकी नंबर टाकावा लागेल. यानंतर ग्राहकाच्या मोबाईलवर एक कर्न्फर्मेसन मेसेज येईल. तो कन्फर्म करताच तुमचा सिलेंडर बुक होईल. याशिवाय, अ‍ॅमेझॉन पेमेंटच्या साहाय्याने पैसे अदा केल्यास ग्राहकांना 50 रुपयांची कॅशबॅकही मिळेल.

इतर बातम्या:

लक्षात ठेवा! 1 नोव्हेंबरपासून सिलेंडरच्या डिलिव्हरीचा नियमात झालेले बदल

पेन्शनधारकांनो लक्ष द्या; ‘हे’ प्रमाणपत्रं जमा न केल्यास पेन्शन थांबणार!

चालू खात्याबाबत 15 डिसेंबरपासून नवा नियम, कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर परिणाम काय?

(book gas Cylinders on Amazon)