मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांना 29 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे चांदोळे तीन दिवस ईडीच्या ताब्यात राहणार असून त्यांची ईडीकडून कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच चांदोळे यांना न्यायालयाने कोठडी सुनावल्याने हा सरनाईक यांच्यासाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. (Amit Chandole sent to ed custody till 29 Nov)
टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल अमित चांदोळे यांची ईडीने कसून चौकशी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. आज सकाळी ईडीने चांदोळे यांना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने चांदोळे यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे चांदोळे 29 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या ताब्यात राहणार असून या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील ही अत्यंत महत्त्वाची चौकशी मानली जात आहे. या तीन दिवसात चांदोळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडी पुढील सूत्रे हलवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, ईडीने मंगळवारी (24 नोव्हेंबर) प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं. (Amit Chandole sent to ed custody till 29 Nov)
प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं होतं. त्यामुळे ईडीने त्यांना पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. (Amit Chandole sent to ed custody till 29 Nov)
सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले, परदेशात मालमत्ता घेतल्या; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोपhttps://t.co/d4A2sDILLK#kiritsomaiya #bjp #MahaVikasAghadi #PratapSarnaik #ed #maharashtragovt
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 26, 2020
संबंधित बातम्या:
प्रताप सरनाईकांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळेंना अटक, ईडीकडून सलग 12 तास चौकशी
प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांची ‘सामना’च्या कार्यालयात भेट; दीड तास गुप्त चर्चा
LIVE | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाईन, पुढील आठवड्यात चौकशीला बोलवण्याची ED ला विनंती
(Amit Chandole sent to ed custody till 29 Nov)