Marathi News Latest news Amitabh bachchan abhishek bachchan aishwarya rai aaradhya bachchan all family tested corona positive
PHOTO : बच्चन कुटुंबियांना कोरोनाचा विळखा
महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. (bachchan family corona positive)
Follow us
महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि नात आराध्या बच्चन या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे.
सुदैवाने अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
बच्चन कुटुंबियांवर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
बच्चन कुटुंबियांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी ठिकठिकाणी चाहत्यांकडून पूजा, होमहवन आणि सोशल मीडियावर प्रार्थना केली जात आहे.
बच्चन कुटुंबियांचा जलसा, जानकी या बंगल्यांचं बीएमसीकडून दररोज निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
या चौघांनाही कोरोनाची सौम्य लक्षण आहेत.
तर अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदा यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
श्वेता नंदा हिची दोन मुले अगस्त्या नंदा आणि नव्या नवेली नंदा यांचेही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.