अमोल कोल्हेंचा Why I killed Gandhi प्रदर्शित होऊ देणार नाही, कॉंग्रेस आक्रमक
डॉ. अमोल कोल्हे यांच्या Why I Killed Gandhi चित्रपटाला त्यांच्याच पक्षातून विरोध दर्शविला जात आहे तसाच आता कॉंग्रेसकडूनही कोल्हे यांनी आपली वैचारिक भूमिका स्पष्ट करावी अन्यथा हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
अकोलाः राष्ट्रवादी (National Congress Party) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या Why I killed Gandhi या चित्रपटाला कॉंग्रेस (Congress) पक्षाकडूनही आता विरोध होऊ लागला आहे. अमोल कोल्हे यांची वैचारिक (Ideology) भूमिका स्पष्ट असेल तर जाहीरपणे गोडसे मुर्दाबाद म्हणण्याची हिम्मत दाखवाण्याची हिम्मत दाखवावी अशी भूमिका स्पष्ट केली आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराही महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे मीडिया पॅनलिस्ट कपिल ढोके यांनी दिला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेमुळे या भूमिकेबद्दल कोल्हे काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळात साऱ्यांच लक्ष लागले आहे. त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हे यांची पाठराखण तर डॉ. जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
आरएसएस असल्याचे स्पष्ट होईल
खासदार अमोल कोल्हे यांनी Why I Killed Gandhi या चित्रपटात फक्त भूमिक केली असेल. आणि डॉ. कोल्हे यांची वैचारिक भूमिका गोडसेंविरोधी असेल तर त्यांनी शाब्दीक गोंधळ न घालता जाहीरपणे गोडसे मुर्दाबाद म्हणण्याची हिम्मत दाखवावी नसेल तत त्यांची भूमिका ही गोडसे यांचे उदात्तीकरण करणारी आणि आरएसएसवादी असल्याचे स्पष्ट होईल असे मत व्यक्त करण्यात आले आहे. खासदार असलेले अमोल कोल्हे यांच्यासारखे राष्ट्रवादी पक्षाचे लोकप्रतिनिधी गोडसे यांच्या विचारांचे उदात्तीकरण करत असतील तर Why I Killed Gandhi हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा कॉंग्रेस कमिटीचे मीडिया पॅनलिस्ट कपिल ढोके यांनी दिला आहे.
आरोग्य मंत्री यांनीही अमोल कोल्हे यांचा पाठराखण केली आहे. अमोल कोल्हे अभिनेते असून त्यांनी गोडसे यांची भूमिका केली असली तरी ते गोडसे समर्थक असू शकतात असे होत नाही असे त्यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. त्यांच्याकडे एक कलाकार म्हणून बघा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
अशा चित्रपटांना कायमच विरोध
Why I Killed Gandhi या चित्रपटातील कोल्हे यांच्या भूमिकेबद्दल गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आधीपासूनच विरोध केला आहे. नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाचा कोणताही सिनेमा निघत असेल तर अशा चित्रपटांना कायमच विरोध असेल अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे. तसेच राष्ट्रवादीत येण्याअगोदरची भूमिका कोल्हे यांनी केली असेल तर त्याचे प्रदर्शन इतक्या उशिरा का होते आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या नंतर त्यांच्याच पक्षाचे मंत्री जयंत पाटील यांनीही विरोध दर्शवित नथुराम गोडसे हा चित्रपट त्यांच्या विचारांचे समर्थन करणारा असेल तर नक्कीच त्याला विरोध केला जाईल असे मत त्यांनी मांडले होते.
संबंधित बातम्या