12 क्विंटल पोळ्या, 3 क्विंटल भात, 14 गंज भाजी, 8 हजारांच्या स्वयंपाकाला सुरुवात कधी? वाचा अमरावतीचा खास रिपोर्ट!

शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या बच्चू कडू यांचे हजारो कार्यकर्ते अमरावतीत दाखल झाले आहेत.

12 क्विंटल पोळ्या, 3 क्विंटल भात, 14 गंज भाजी, 8 हजारांच्या स्वयंपाकाला सुरुवात कधी? वाचा अमरावतीचा खास रिपोर्ट!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 1:40 PM

स्वप्निल उमप, अमरावतीः प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा भव्य मेळावा आज अमरावतीत (Amravati) होत आहे. राज्यातील सध्याची स्थिती आणि भाजप आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेले आरोप या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढीची भूमिका काय असावी, यासंदर्भात आज महत्त्वाचा मेळावा अमरावतीत आयोजित करण्यात आला आहे.  शेतकरी, कष्टकरी आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या बच्चू कडू यांचे हजारो कार्यकर्ते अमरावतीत दाखल झाले आहेत. जवळपास 8 हजार कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

AMT Food

मंगळवारी दुपारी हा मेळावा आयोजित करण्यात आला. यासाठी सोमवारी रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करायला सुरुवात झाली आहे. सोमवारी पहाटे तीन वाजेपासून येथे स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे.

AMT Food

मंगळवारी सकाळपर्यंत तब्बल 12 क्विंटल पोळ्या, 3 क्विंटल भात आणि 14 पातेले भाजी तयार कऱण्यात आली आहे. राज्यभरातून आलेले कार्यकर्त्यांच्या जेवणासाठीची सोय सकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली.

अमरावतीत बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. खोके अर्थात पैसे घेऊन सरकारला पाठिंबा दिल्याचा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलाय. त्यामुळे बच्चू कडू यांचे कार्यकर्ते संतापले आहेत. रवी राणा यांनी या वक्तव्यावर माफी मागितली असली तरीही कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील भूमिका घेणार असल्याचं बच्चू कडू म्हणालेत.

AMT Food

बच्चू कडू यांच्या सभेसाठी राज्यभरातील अंध, अपंग बांधव दाखल झाले आहेत. अमरावतीच्या टाऊन हॉल येथे सुमारे आठ हजार लोकांचे जेवण तयार करण्यात आले आहे. रात्री तीन वाजता पासून जेवण तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आता पर्यंत12 क्विंटल पोळ्या, भात 3 क्विंटल, 14 गंज दालभाजी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....