PHOTO : अमरावतीत कडाक्याची थंडी, विदर्भाचं नंदनवन धुक्यात हरवलं
विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे पहाटेपासूनच हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवायला मिळत आहे. (Amravati Chikhaldara hill station In winds)
-
-
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता नागरिक सकाळच्या वेळी स्वेटर घालून बाहेर पडताना दिसत आहे.
-
-
अमरावतीतही काही ठिकाणी थंडी वाढली आहे. विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे पहाटेपासूनच हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवायला मिळत आहे.
-
-
अमरावती जिल्ह्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा येथे थंडी वाढली. पहाटेच्यावेळी या ठिकाणी थंड बोचरे वारे वाहतात. जिकडे तिकडे धुकं दिसत आहे.
-
-
त्यामुळे पुन्हा एकदा चिखलदरा धुक्यात न्हाऊन निघाले. धुक्यांमुळे निसर्गाचं सौंदर्य देखील फुलायला सुरुवात झाली आहे.
-
-
अनेक पर्यटक थंडीचा धुक्याचा आनंद घेण्यासाठी चिखलदऱ्यात दाखल होत आहे.
-
-
थंडीमुळे स्थानिक लोक शेकोटीचा आधार घेत आहे. तर काही जण गरम गरम चहावर देखील ताव मारताना दिसत आहे.
-
-
पाहा काही फोटो
-
-
पाहा काही फोटो
-
-
(प्रातनिधिक फोटो)