तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब नमुने प्रकरण; अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा संताप

नवनीत राणा यांनी पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब नमुने प्रकरण; अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा संताप
Follow us
| Updated on: Jul 30, 2020 | 3:48 PM

अमरावती : कोव्हिड लॅबमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार अमरावतीत उघडकीस आला हे. त्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून राजकीय वातावरणही तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चांगल्याच संतप्त झाल्या आहेत. (Amravati MP Navneet Rana angry as lab technician took swab testing from lady’s urinal)

नवनीत राणा यांनी पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. “महिला याआधीच सक्षम झाल्यामुळे मी खासदार झाले. तर प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. याच जिल्हात महिला खासदार, महिला पालकमंत्री आहेत, तरीही याच जिल्हात असे धक्कादायक प्रकार होत आहेत” अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

“अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोव्हिड रुग्णांचे हाल होत आहेत. कोव्हिड तपासणी करणाऱ्या खाजगी, कंत्राटी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून पाहली पाहिजे” असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

नेमकं काय घडलं?

संबंधित तरुणी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आली होती. त्यामुळे या तरुणीची कोरोना चाचणी करणे आवश्यक होतं. त्यामुळेच ती चाचणीसाठी लॅबमध्ये गेली असता, तिच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा आरोपीला अटक केली. अल्पेश अशोक देशमुख (30, रा. पुसदा, जि. अमरावती), असे आरोपीचे नाव असून तो बडनेऱ्याच्या लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून काम पाहतो.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

संबंधित 24 वर्षीय तरुणी अमरावती इथे भावाकडे राहत असून, एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, संपर्कातील 20 जणांचे स्वॅब 28 जुलैला ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाऱ्या आरोपी अल्पेश देशमुखने संबंधित मुलीला परत बोलावून तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले.

यानंतर त्या तरुणीने ही बाब वरिष्ठ महिला सहकाऱ्यास सांगितली. त्या दोघींनी महिला कर्मचारी नाही का, असे विचारले. त्यावर लॅब टेक्निशियनने महिला नसल्याचे सांगितले. तपासणी करण्यासाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असे म्हटले.

त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली. त्यानंतर टेक्निशियनने तुमची टेस्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले. गुप्तांगाद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीस शंका आल्याने, तिने त्याबाबत भावाला सांगितले. त्याने डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी अशाप्रकारे चाचणी करत नसल्याचे सांगितले. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह गुन्हा दाखल केले आहेत.

संबंधित बातमी :

24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब नमुने, संतापजनक प्रकारानंतर लॅब टेक्निशिअनला बेड्या

(Amravati MP Navneet Rana angry as lab technician took swab testing from lady’s urinal)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.