संजय राऊत यांच्यामुळेच आनंद दिघेंना टाडा लागला?; शिंदे गटाच्या खासदाराच्या आरोपाने खळबळ

आनंद आश्रमातील व्हिडीओ संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी जी काही ॲक्शन घ्यायची होती ती घेतलेली आहे, अशा गोष्टींना कोणीही प्राधान्य देत नाही असेही शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने म्हटले आहे.

संजय राऊत यांच्यामुळेच आनंद दिघेंना टाडा लागला?; शिंदे गटाच्या खासदाराच्या आरोपाने खळबळ
संजय राऊत
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 3:05 PM

ठाणे येथील टेंभीनाका परिसरातील आनंद आश्रमात पैसे उधळण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर उलट सुलट प्रतिक्रीया येत आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील या व्हिडीओ वरुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टिका केली आहे. या संदर्भात आता लुटीचा पैसा आनंद आश्रमात ठेवला जातो असा आरोप करीत आज जर आनंद दिघे असते तर त्यांनी त्यांच्या त्या प्रसिद्ध हंटरने पैशाची उधळपट्टी करणाऱ्यांना फोडून काढले असते अशी टिका संजय राऊत यांनी केली आहे. या संदर्भात ठाण्याचे एकनाश शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी टिका केली आहे.

संजय राऊत यांनी आनंद आश्रमातील व्हिडीओवर केलेल्या टिप्पणीचा खासदार नरेश म्हस्के यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. लुटीचे पैसे त्या ठिकाणी ठेवले जात असल्याचा संजय राऊत यांचा आरोप असेल तर तो धर्मवीर आनंद साहेब यांचा अपमान आहे असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. संजय राऊत हा दिघे द्वेष्टा माणूस आहे. दिघे साहेबांचा या माणसाने कायम तिरस्कार केलेला आहे. या माणसाने कायमच दिघे यांना विरोध केला आहे. खोपकर हत्याकांडा नंतर संजय राऊत यांनी लोकप्रभामध्ये जो लेख लिहीला होता. त्यात काही गोष्टी त्यांनी लिहीलेल्या होत्या. त्यामुळे दिघे साहेबांना टाडा लागला आणि दिघे यांना तुरुंगात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्याचे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

आम्हाला दिघे साहेब शिकविण्याचा प्रयत्न करु नये

बाळासाहेबांकडे कायम दिघे साहेबांविषयी तक्रार करणे, त्यांच्याविषयी चुकीचं सांगणे हे काम संजय राऊत कायम करीत आले आहेत. या सर्व मंडळींनी एकत्र येऊन दिघे साहेबांना राजकारणातून संपवण्याची यांनी सुपारी घेतली होती आणि त्यामुळे दिघे साहेब व्यथित सुद्धा झाले होते. त्यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये, दिघे साहेब गेल्यानंतर यांना कधी दिघे साहेबांची यांनी कधी आठवण आली का ?, काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला दिघे साहेबांचं नाव देण्याचा ठराव या लोकांनी आम्हाला मागे घ्यायला लावला, या नाट्यगृहाला दिघे साहेबांचं नाव देऊ दिलं नाही, एवढा तिरस्कार ही मंडळी करायची असेही म्हस्के यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे जर संजय राऊत बोलत असतील तर त्यांच्या सभोवतालची, जी उबाठाची ठाण्यातील मंडळी आहे ती कोण  आहेत ? ज्यांनी कायम दिघे साहेबांचा तिरस्कार केला. शिवसेनेत काम करीत असताना दिघे साहेबांच्या विरुद्ध शिवसेनेत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला अशीच ठाणे जिल्ह्यातली मंडळी त्यांच्याबरोबर आहेत असाही आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.