Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात 8 हजार पोलिसांच्या आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली.

राज्यात 8 हजार पोलिसांच्या आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Feb 15, 2020 | 8:36 PM

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात पोलीस भरतीविषयी मोठी घोषणा केली (Anil Deshmukh annouce Police recruitment). मागील सरकारने गेल्या 5 वर्षात पोलीस भरती केली नाही. मात्र, आम्ही पोलिसांच्या 8 हजार जागा भरणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. यासोबत 7 हजार सिक्युरिटी गार्डची भरती करणार असल्याचीही घोषणा गृहमंत्री देशमुख यांनी केली.

अनिल देशमुख म्हणाले, “मागील सरकारने गेल्या 5 वर्षात पोलीस भरती केली नाही. मात्र, आम्ही पोलिसांच्या 8 हजार जागा आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार आहोत. तसेच बलात्कार गुन्ह्यांबाबत आंध्र प्रदेश सरकारनं केलेल्या कायद्याचाही आम्ही अभ्यास करणार आहोत. त्यासाठी 20 फेब्रुवारीला मी स्वतः आंध्र प्रदेशमध्ये जाणार आहे. हिंगणघाटसारख्या घटना रोखता याव्यात यासाठी आंध्रप्रदेशमधील कायदा महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करणार आहे.”

राज्य सरकार कोरेगांव भीमा प्रकरणाचा तपास करत होतं. जर हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) द्यायचा होता, तर केंद्राने राज्य शासनाला विश्वासात घ्यायला पाहिजे होते. मात्र, तसं झालं नाही. एनआयएचा तपास सुरु असताना समांतरपणे विशेष तपास पथकाची (SIT) स्थापन करता येते का याचा कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. जर कायदेशीर तरतूद असेल तर भीमा कोरेगावप्रकरणी एसआयटीची स्थापन करू, असंही अनिल देशमुख यांनी नमूद केलं.

विशेष म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आगामी काळात पुण्यात दीड ते दोन लाख सीसीटीव्ही बसवणार असल्याचीही घोषणा केली. देशमुख यांनी यावेळी फोन टॅपिंगवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “फोन टॅपिंग प्रकरणी आम्ही दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यांचा अहवाल आला की याबाबत माहिती दिली जाईल. जळगावच्या भाजप नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे त्यांच्या पण नेत्याच्या फोन टॅपिंगसंदर्भात चौकशी करण्याचा आग्रह केला. आहे. त्याचाही विचार करु.”

NRC आणि CAA मुळे महाराष्ट्रात कुठल्याही नागरिकाचे नागरिकत्व जाऊ देणार नसल्याचंही देशमुख यांनी नमूद केलं. देशमुख यांनी शरद पवार यांचं पत्र मिळालं असून त्याबाबत अधिकाऱ्याना सूचना केल्याची माहिती दिली.

“शरद पवारांनी दोन महिने आधीच गृहमंत्रिपद देणार असल्याचं सांगितलं होतं”

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यातील आपल्या प्रकट मुलाखतीत त्यांच्या गृहमंत्रिपदाबाबत मोठा खुलासा केला. ते म्हणाले, “गृहखाते मिळणार याबाबत शरद पवार यांनी मला दोन महिने आधी नागपूरचं अधिवेशन सुरु असतानाच सांगितलं होतं.”

संबंधित बातम्या :

Anil Deshmukh annouce Police recruitment

कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.