आधीच एसटी तोट्यात, कोरोनाने तोटा वाढला, विचाराअंती पूर्ण क्षमतेने बसेस सुरु : अनिल परब

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरु करण्याची घोषणा केली आहे (Anil Parab announce about ST Buses with Full capacity ).

आधीच एसटी तोट्यात, कोरोनाने तोटा वाढला, विचाराअंती पूर्ण क्षमतेने बसेस सुरु : अनिल परब
Follow us
| Updated on: Sep 18, 2020 | 8:58 PM

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यात पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरु करण्याची घोषणा केली आहे (Anil Parab announce about ST Buses with Full capacity ). “विचाराअंती आम्ही एसटी बस सेवा पुर्ण क्षमतेने सुरू केलीय. मास्क, सॅनिटाइझ करणे बंधनकारक केलंय. सुरक्षा घेऊनच एसटी प्रवास सुरु केलाय. एसटी आधीच तोट्यात होती. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत आणखी तोट्यात गेली. त्यामुळे आता एसटी सुरु केलीय,” असं मत अनिल परब यांनी व्यक्त केलं.

अनिल परब म्हणाले, “एसटी बसेसला परवानगी देताना सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही पूर्ण क्षमतेने एसटी चालवण्याचा निर्णय घेतला. हे करताना बसमध्ये मास्क लावणं बंधनकारक आहे. प्रत्येक फेरीला बसेसचं निर्जंतुकीकरण केलं जातंय. प्रवाशांसाठी देखील बसेसमध्ये सॅनिटायझर ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक प्रवाशाने हात सॅनिटाईझ केल्यावरच बसमध्ये प्रवेश करायचा आहे. सुरक्षेबाबत सर्व खबरदारी घेऊन आम्ही पूर्ण क्षमतेने बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.”

“मागील साडेपाच महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा सोडली तर एसटीचा पूर्णपणे प्रवास बंद होता. अगोदरच एसटी प्रचंड तोट्यात होती. त्यात हे कोरोनाचं संकट आलं. त्यामुळे एसटी आणखी तोट्यात गेली. या सर्व परिस्थिती माझ्यासमोर कामगारांचे पगार हा मोठा प्रश्न आहे. एसटीतून फार कमी उत्पन्न आहे आणि पगार जवळपास 300 कोटी रुपयांचा आहे. म्हणून 2 महिन्यांपूर्वीच राज्य सरकारकडून 550 कोटी रुपये घेऊन पगार केले होते. मी पुन्हा एकदा राज्य सरकारकडे पगारासाठी पैशांची मागणी केली आहे. बँकेतून कर्ज काढून पगार देता येतात का याबाबत देखील प्रयत्न सुरु आहेत. पुढील आठवड्यात यावर नक्कीच सकारात्मक उत्तर मिळेल आणि कर्मचाऱ्यांचे पगार होतील,” असं अनिल परब म्हणाले.

कोरोना संसर्गामुळे कुणी दगावलं तर मनसे जबाबदारी घेणार का? : अनिल परब

अनिल परब यांनी मनसेच्या लोकल सुरु करण्याच्या मागणीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “आम्ही राज्य चालवताना लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य घेऊनच निर्णय घेतोय. त्यामुळे लोकल सेवा सुरु केली आणि त्यामुळे पूर्वी प्रमाणे लोकांची गर्दी होऊन दूर्दैवाने पुन्हा संसर्ग झाला, यात कुणी दगावलं, तर मनसे जबाबदारी घेणार आहे का? आम्ही काळजी घेऊनच लोकल सेवा सुरु करु.”

“… म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कार्यक्रम पुढे ढकलला”

अनिल परब म्हणाले, “हा कार्यक्रम MMRDA ने आयोजित केला होता. त्यांनी मर्यादीत लोकांना निमंत्रित केलं होतं. त्यामुळे इतर मंत्र्यांनी मोठा कार्यक्रम करुन इतर मान्यवरांनाही बोलवता येईल, असा प्रस्ताव दिला. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला.”

“कंगनाच्या घरावरील कारवाईचा निर्णय बीएमसी घेईल”

“कंगनाला आमच्या शुभेच्छा आहेत. तिला जे काही करायचं आहे ते तिने करावं. ती मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणते. तिच्या घरावरील कारवाईबाबत बीएमसी ठरवेल. हे प्रकरण 2018 मधील आहे. त्यावेळी तर कंगना विरुद्ध शिवसेना असं काही नव्हतं. त्यामुळे बीएमसी कायदेशीर कारवाई करायचं की नाही ते ठरवेल,” असंही अनिल परब यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

एसटी सुसाट, पूर्ण आसन क्षमतेने धावणार, मात्र प्रवाशांना ‘हे’ नियम अनिवार्य

‘इंदू मिलची जागा मोदींमुळेच’, पायाभरणीचा कार्यक्रम लपून छपून का? : देवेंद्र फडणवीस

आधी आरक्षण, मगच भरती, संभाजीराजे छत्रपतींचा पवित्रा, मराठ्यांच्या डोळ्यात धूळफेक नको

युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस

संबंधित व्हिडीओ :

Anil Parab announce about ST Buses with Full capacity

'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.