Kirit Somaiya : रिसॉर्टचा टॅक्स अनिल परबांनी भरला मग रिसॉर्ट कदमांचा कसा, किरीट सोमय्यांचा सवाल
अनिल परबांचा सातबारा कोरा करणार, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण जरा वेगळं पहायला मिळतंय. शिवसेना आणि भाजपमधील द्वंद सर्वश्रूत आहेच. वारंवार दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये या न त्या कारणावरुन कुरबुरी देखील सुरू असतात. यातच आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. अनिल परबांचा सातबारा कोरा करणार, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे. तर याचवेळी त्यांनी साई रिसॉर्टचा टॅक्स अनिल परबांनी भरला असल्याचंही त्यांनी उघड केलं. रिसॉर्टचा टॅक्स (Tax) अनिल परबांनी भरला मग रिसॉर्ट कदमांचा कसा, असा सवाल यावेळी सोमय्यांनी उपस्थित केलाय. यामुळे पुन्हा एकदा नवा वाद उभा राहिलाय. महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्यावर सोमय्यांनी आरोप केल्यानं सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघालंय.
Published on: May 27, 2022 11:12 AM
Latest Videos