अंकिता लोखंडेचा सुशांतसाठी खास डान्स परफॉर्मन्स, व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांतसाठी एक खास डान्स परफॉर्मन्स करणार आहे. (Ankita Lokhande Sushant Singh)

अंकिता लोखंडेचा सुशांतसाठी खास डान्स परफॉर्मन्स, व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 10:47 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande )सुशांतसाठी खास डान्स परफॉर्मन्स करणार आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत तिने ही माहिती दिली आहे. सुशांसोबतच्या आठवणींनी उजाळा देणार असल्याचं तिने सांगितलं आहे. दरम्यान, अंकिताने याआधी ‘बँग बँग’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं होतं. (Ankita Lokhande special dance for Sushant Singh Rajput)

अंकिता झी रिश्ते अवॉर्ड सोहळ्यात डान्स परफॉरमन्स करणार आहे. यासाठी ती सध्या डान्सचा सराव करत आहे. हा सराव करतानाचा एक व्डिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती ‘चलो ले चले तुम्हे तारोंके शहर मे’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिने “यावेळी परफॉर्म करण्यासाठी अतिशय वेगळं आणि अवघड आहे. माझ्याकडून खास तुझ्यासाठी,” असं म्हणत तिने हा परफॉर्मन्स खास सुशांतसाठी करणार असल्याचं सांगितलं आहे. या खास व्हिडीओला तिच्या तसेच सुशांतच्या चाहत्यांकडून भरभरुन लाईक्स मिळत आहेत. अंकिताचे चाहते सुशांतसाठीचा हा डान्स पाहण्यासाठी चांगलेच उत्सुक असल्याचं दिसत आहे.

या आधीच्या बँग बँग गाण्यामुळे अंकिता ट्रोल

दरम्यान, अंकिताने याआधी एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि विक्की जैन (तिचा होणारा नवरा) व्हाइट कलरच्या नाईटड्रेसमध्ये हृतिक रोशन आणि कतरिना कैफच्या ‘बँग बँग’ गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. ‘विक्की आणि अंकी, नाईट ड्रेसमध्ये तेही डान्स करताना’, म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला होता.

अंकिताचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांनी खूप आवडला. तिच्या चाहत्यांनी दोघांच्या डान्सचे कौतुकही केले. मात्र, सुशांतच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला नाही आणि त्यामुळे हा व्हिडीओ जोरदार ट्रोल झाला. आम्ही सुशांतला अजून विसरलो नाही, हे काय आहे?, हे तुझे सुशांतवरचे प्रेम आहे का?’ अशा वेगवेगळ्या कमेंट करत सुशांतच्या चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर नापसंती व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या :

Ankita Lokhande | ‘न्यायासाठीचा लढा विसरलीस का?’, सुशांतच्या चाहत्यांकडून अंकिता लोखंडे ट्रोल

Ankita Lokhande | बॉयफ्रेंडसह ‘बँग बँग’ गाण्यावर नृत्य, अंकिता लोखंडेवर सुशांतचे चाहते नाराज!

‘आम्ही एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता’, अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीचा दावा खोडला

(Ankita Lokhande special dance for Sushant Singh Rajput)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.