राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवून वैज्ञानिक प्रगतीचा अवमान, ‘अंनिस’कडून निषेध
राजनाथ सिंहसारख्या सुशिक्षित व्यक्ती जर असं वागत असतील, आणि त्याचं समर्थनही करत असतील, तर काय उपयोग? असा खरमरीत सवाल 'अंनिस'च्या मिलिंद देशमुख यांनी विचारला.
पुणे : फ्रान्समध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवून केलेल्या पूजेचा ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’कडून (Andhashraddha Nirmoolan Samiti) निषेध (ANS Condemns Rajnath Rafale Pooja) व्यक्त करण्यात आला आहे. वैज्ञानिक युगात अशा प्रकारचं कृत्य केल्याबद्दल ‘अंनिस’ने नाराजी व्यक्त केली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त राफेल विमान भारतात येत आहे. त्याचवेळी राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवून पूजा केल्याचे फोटो वायरल झाले आहे. याची शहानिशा करायला हवी. खरंच हा प्रकार घडला असल्यास अत्यंत निंदनीय आहे, असं अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख म्हणाले.
भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. मात्र त्यावेळीही अशा प्रकारचं अवैज्ञानिक कृत्य केलं गेलं नव्हतं. आज विज्ञान युगातही आपण अवैज्ञानिक कृत्य (ANS Condemns Rajnath Rafale Pooja) करत असल्याचं जगाला दाखवत आहोत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव तपासणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन. इतक्या सुशिक्षित व्यक्ती जर असं वागत असतील, आणि त्याचं समर्थनही करत असतील, तर काय उपयोग? असा खरमरीत सवाल मिलिंद देशमुख यांनी विचारला.
काही जण विचारतात, की अशा प्रकारे विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याने काय बिघडतं? आपण जेव्हा पुढच्या पिढीला या गोष्टी दाखवतो, तेव्हा एकप्रकारे वैज्ञानिक प्रगतीचा अपमान करतो. यामुळे नव्या पिढीला आपण अवैज्ञानिक बनवत आहोत, अंधश्रद्धांना खतपाणी घालत आहोत, अशी टीका मिलिंद देशमुख यांनी केली आहे.
फ्रान्सने बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत RB 001 राफेल (Rafale combat jet ) हे विमान भारताला काल सोपवलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये या विमानातून (Rafale combat jet ) पहिली भरारी घेतली. दसऱ्याच्या मुहूर्तावर भारताच्या ताब्यात राफेल विमान मिळालं.
दसऱ्याला शस्त्रपूजेची परंपरा असल्यामुळे राजनाथ सिंह यांनी लढाऊ विमानाची पूजा केली. राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्येही भारतीय परंपरा दाखवत, राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू आणि विमानावर ओम काढलं. राफेल विमानाची पूजा करुन, त्यानंतर राजनाथ सिंह यानी त्यातून भरारी घेतली.
राफेल विमान
मोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात 126 राफेल विमानांचा करार झाला होता, मात्र त्यावेळी काही नियम अटींमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नव्हता. मोदी सरकारने केलेल्या करारावरुन काँग्रेसने घोटाळ्याचा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. पण कोर्टाने मोदी सरकारला क्लीनचीट दिली.
राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार काय आहे? भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा व्यवहार 23 सप्टेंबर 2016 रोजी झाला. 7.87 अब्ज युरो म्हणजेच जवळपास 59 हजार कोटी रुपयांचा हा करार आहे. हा व्यवहार दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये झाला. भारताची हवाई ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा व्यवहार झाला. ही विमानं फ्रान्सची दसॉल्ट कंपनीने तयार केली आहेत. ही विमानं सप्टेंबर 2019 मध्ये भारताला मिळणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 एप्रिल 2015 रोजी फ्रान्स दौऱ्यावर होते, त्यावेळी मोदी आणि फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष फ्रांसवा ओलांद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या व्यवहाराची माहिती दिली होती.
संबंधित बातम्या
राफेल परीक्षेत मोदी पास, व्यवहारात कोणताही संशय नाही: सुप्रीम कोर्ट
18 च्या किंमतीत 36 विमानं मिळतायत, गैरव्यवहाराचा संबंधच नाही : दसॉल्ट
राफेल करार कसा झाला? सरकारने सुप्रीम कोर्टात ए टू झेड सांगितलं!