‘या’ आजारात अँटी-बायोटिक्सचा वापर टाळा, शरीराचे होऊ शकते नुकसान

अँटी-बायोटिक्सचा अधिक प्रमाणात वापर केल्याने पोटासंदर्भात समस्या उद्भवतात. त्याचा परिणाम आतड्यांवर होतो. ही औषधे आतड्यातील चांगला बॅक्टेरिया नष्ट करतात.

'या' आजारात अँटी-बायोटिक्सचा वापर टाळा, शरीराचे होऊ शकते नुकसान
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 11:45 AM

नवी दिल्ली – कोरोनाची साथ आल्यापासून लोकांमध्ये अँटी-बायोटिक्स (औषधे) घेण्याची (antibiotics) सवय वाढली आहे. डोकेदुखी, ओटीपोटात दुखणे आणि खोकला-सर्दी (cough and cold) असा त्रास झाल्यास अनेक लोकं डॉक्टरांचा सल्ला न घेताच अँटी-बायोटिक्सचे सेवन करतात. त्यामुळे त्वरित आराम तर मिळतो, पण त्यामुळे शरीराचे काय नुकसान होते (side effects of antibiotics) याचा तुम्ही विचार केला आहे का? या औषधांमुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार होत असल्याचे डॉक्टर सांगतात. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, सुमारे एक तृतीयांशआजारांमध्ये अँटी-बायोटिक्सचा वापर करणे आवश्यक नसते. हे आजार किंवा समस्याचे काही दिवसातच बरे होतात. पण तरीही काही लोक अँटी-बायोटिक्स घेतात, ज्यामुळे शरीराचे खूप नुकसान होते.

अँटी-बायोटिक्समुळे होणारे नुकसान

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अँटी-बायोटिक्सच्या अतिसेवनामुळे शरीरात या औषधांना प्रतिकारशक्ती निर्माण होते. ज्याला अँटी-बायोटिक रेझिस्टन्स म्हणजेच प्रतिजैविक प्रतिरोधक असे म्हटले जाते. याचाच अर्थ असा की, यामुळे आपल्या शरीरावर होणारा औषधांचा प्रभाव थांबतो. त्यामुळे केवळ आजार वाढत नाही तर तो आजार बरा होण्यासही बराच वेळ लागतो. तसेच ही औषधे शरीरासाठी फायदेशीर बॅक्टेरियादेखील मारतात अथवा नष्ट करतात.

हे सुद्धा वाचा

अँटी-बायोटिक्सच्या अधिक सेवनामुळे होणारे नुकसान

– अँटी-बायोटिक्सचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. त्याचा परिणाम आतड्यांवर होतो. ही औषधे आतड्यातील चांगला बॅक्टेरिया नष्ट करतात. त्यासोबतच फंगल इन्फेक्शनही होते, ज्यामुळे पोटाचे अनेक आजार होतात.

– अँटी-बायोटिक्सचा मुलांवरही परिणाम होतो. त्यांच अतिसेवना केल्यामुळे मुलांचे दात खराब होतात.

– ॲलर्जीक रिॲक्शन, ब्लड रिॲक्शन आणि हृदयाच्या गंभीर समस्या देखील निर्माण होतात.

या आजारांमध्ये अँटी-बायोटिक्स घेण्याची गरज नाही

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ताप, सर्दी-खोकला ब्रॉंकायटिस, सायनस अशा अनेक आजारांमध्ये अँटी-बायोटिक (औषधे) घेण्याची गरज नसते. या समस्या अथवा आजार असताना अँटी-बायोटिकचा वापर करू नये. व्हायरल इन्फेक्शनसाठी देखील अँटी-बायोटिक्स प्रभावी ठरत नाहीत. अशा प्रकारचा संसर्ग झाल्यास अँटी-बायोटिक्समुळे खूप नुकसान होऊ शकते. म्हणूनच डॉक्टर अशा आजारांमध्ये लोकांना अँटी-बायोटिक न घेण्याचा सल्ला देतात, हा त्रास काही दिवसांत आपोआप बरा होतो.

एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.