Marathi News Latest news Anushka and virat kohli dream home flat in mumbai cost rs 35 crore see the house inside pics
Photos | Virushka Dream Home | विराट-अनुष्काच्या घराच्या चहुबाजूंनी मनमोहक नजारे, किंमत तब्बल…
Photos | Virushka Dream Home | विराट-अनुष्काच्या घराच्या चहुबाजूंनी मनमोहक नजारे, किंमत तब्बल...
Follow us
विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) भारतातील सर्वाधिक पसंतीच्या जोड्यांपैकी एक आहे.
दोघेही आपआपल्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांच्या कामावर त्यांचे लाखो चाहते जीव ओवाळून टाकतात.
या सर्वच चाहत्यांना विराट-अनुष्काच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुकता असते. ते देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कधीकधी आपल्या चाहत्यांशी माहिती किंवा फोटो शेअर करत असतात.
मात्र, विराट-अनुष्काच्या मुंबईतील ड्रिम होमविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. विरुष्काच्या या घराची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे, जी ऐकूण अनेकांना विश्वास बसणार नाही.
विराट आणि अनुष्का मूळचे मुंबईचे नाहीत. मात्र, ते आपला अधिकाधिक वेळ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घालवतात. याचं कारण म्हणजे अनुष्काचं काम मुंबईतच अधिक असतं. त्यामुळे या दोघांनीही मुंबईतच आपलं घर खरदी केलं आहे.
विरुष्काने मुंबईत खरेदी केलेल्या आपल्या फ्लॅटची किंमत तब्बल 35 कोटी रुपये आहे. त्यांचा फ्लॅट वरळीतील ओमकार बिल्डिंगच्या 35 व्या मजल्यावर आहे.
वरळीतील विरुष्काच्या या फ्लॅटमधून अरबी समुद्राचे मनमोहक दृष्ये पाहायला मिळतात. या फ्लॅटमध्ये 4 रुमचा समावेश आहे. यातील एक रुम विराट कोहलीच्या व्यायामासाठी (वर्कआऊट) आहे. ही रुम सर्वांनीच त्याच्या लॉकडाऊनमधील काळात शेअर केलेल्या फोटोत पाहिली असेल.