काश्मिरी तरुणांनो शेवटचं सांगतो, बंदूक सोडा अन्यथा ठार करु: इंडियन आर्मी
नवी दिल्ली: “काश्मिरी तरुणांनो बंदूक सोडा, अन्यथा जो कोणी बंदूक उचलेल त्याला सोडणार नाही”, असा थेट इशारा सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराने दिला. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. चिनार कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल केजीएस ढिलन्न यांनी, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड कामरानला 100 तासांच्या आत ठार करुन पहिला बदला घेतल्याचं सांगितलं. तसंच […]
नवी दिल्ली: “काश्मिरी तरुणांनो बंदूक सोडा, अन्यथा जो कोणी बंदूक उचलेल त्याला सोडणार नाही”, असा थेट इशारा सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराने दिला. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ आणि भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
चिनार कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल केजीएस ढिलन्न यांनी, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड कामरानला 100 तासांच्या आत ठार करुन पहिला बदला घेतल्याचं सांगितलं. तसंच पुलवामा हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांसोबत पाकिस्तान आर्मीचाही हात होता, असा दावा त्यांनी केला. गाजी राशीद आणि कामरान या दोन्ही म्होरक्यांना जवानांनी ठार केलं. असे किती कामरान आले आणि किती गेले, असं म्हणत ढिल्लन यांनी आक्रमक भूमिका जाहीर केली.
कामरान हाच या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता, त्याला पाकिस्तानी आर्मीची साथ होती, असं ढिल्लन म्हणाले.
काश्मिरी तरुणांना आवाहन
यावेळी भारतीय लष्कराने काश्मिरी तरुणांना दहशतवादाचा मार्ग सोडण्याचं आवाहन केलं. दहशतवादाच्या मार्गावरील मुलांना समर्पण करायला लावा, असं ढिल्लन यांनी पालकांना आवाहन केलं.
काश्मीरमधील तरुण दहशतवाद्यांनी समर्पण करवां, अन्यथा त्यांना सोडणार नाही. नागरिकांना सुखरुप ठेवून अतिरेक्यांशी दोन हात करु. जो कोणी बंदूक उचलेल त्याला मारुन टाकू. पुलवामा हल्ल्यातील प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा देणार, असा निर्धार भारतीय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला.
अतिरेकी मार्गावरील मुलांना घरी परत बोलवा. हिंसेचा मार्ग सोडा अन्यथा कठोर कारवाई करु, असा इशारा त्यांनी दिला.
Kanwal Jeet Singh Dhillon, Corps Commander of Chinar Corps, Indian Army: Anyone who has picked up a gun will be killed and eliminated. pic.twitter.com/hFFuzLSnLn
— ANI (@ANI) February 19, 2019
Army: I would like to inform that in less than 100 hours of #Pulwama terrorist attack, we eliminated have JeM leadership in the valley which was being handled by JeM from Pakistan pic.twitter.com/8UxYE2bMKs
— ANI (@ANI) February 19, 2019
‘जैश पाकिस्तान का बच्चा’
पुलवामा हल्ल्याला जैश ए मोहम्मद जबाबदार असलं, तरी त्याला पाकिस्तानी आर्मीचा पाठिंबा होता, असं भारतीय अधिकारी म्हणाले.
ढिल्लन यांनी जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना आवाहन केलं. कोणीही नागरिक चकमकीदरम्यान त्या ठिकाणी येऊ नये. चकमक सुरु असताना किंवा चकमक झाल्यानंतर कोणीही तिथे येऊ नये, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल.
जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानचा बच्चा आहे. इथे किती गाझी आले आणि किती गेले. पाकिस्तानी सेना आणि ISI चं जैश ए मोहम्मदवर नियंत्रण आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड कामरानच होता. त्याला ठार करण्यात आलं आहे, असं ढिल्लन यांनी सांगितलं.
या पत्रकार परिषदेला CRPF आणि जम्मू काश्मीरचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये चिनार कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल के जी ढिल्लन, श्रीनगरचे आयजी एस पी पानी, CRPF चे आयजी जुल्फिकार हसन आणि GoC विक्टर फोर्सचे मेजर जनरल मॅथ्यू यांचा समावेश होता.