Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown : एपीएमसीतील फळ मार्केट सोमवारपासून पुन्हा सुरु

गेल्या 11 एप्रिलपासून बंद असलेलं एपीएमसीतील फळ मार्केट सोमवार पासून सुरु होणार आहे.

Lockdown : एपीएमसीतील फळ मार्केट सोमवारपासून पुन्हा सुरु
Follow us
| Updated on: Apr 18, 2020 | 7:51 AM

नवी मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी (APMC Fruit Market Will Open) खबरदारी म्हणऊन नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद करण्यात आले होते. गेल्या 11 एप्रिलपासून बंद असलेलं एपीएमसीतील फळ मार्केट सोमवार पासून सुरु होणार आहे. बाजारात सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने हे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता(APMC Fruit Market Will Open).

‘टीव्ही 9 मराठी’ने एपीएमसीतील फळ बाजारात होणारी गर्दी दाखवली होती. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाने बाजार बंद करण्यात निर्देश दिले होते. मुंबई एपीएमसी प्रशासक, व्यापारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत आता एपीएमसीतील फळ बाजार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी काही निर्बंध लावण्यात आले आहेत. बाजार आवारात 200 ते 250 गाड्यांचीच आवक होणार. त्यामध्ये हापूस आंब्यांच्या 150 गाड्यांचा समावेश असेल. तसेच, बाजार आवारात पूर्णपणे सोशल डिस्टनसिंग मेंटेन न झाल्यास बाजार पुन्हा बंद करण्यात येईल, अशी ताकीदही देण्यात आली आहे (APMC Fruit Market Will Open).

तर, शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना बाजार आवारात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येईल. बाजार आवारात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत व्यापार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व लोकल गाड्या बाजारातून वाहेर काढण्यात येणार आहेत. बाजार आवारात येणाऱ्या ग्राहकांसाठी 15 हजार रुपये किमतीची फळं खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात येईल.

एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण 

एपीएमसी मसाला मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर, काल (17 एप्रिल) धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली. या व्यापाऱ्याला कोरोना झाल्याचे समजताच बाजारातील व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्यात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

बाजारात लॉकडाऊन काळातही मोठ्या प्रमाणात ग्राहक गर्दी करत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही भीती निर्माण झाली होती. त्यामुळेच व्यापारी संघटनांकडूनही मार्केट बंद करण्याची विनंती करण्यात आली होती (APMC Fruit Market Will Open).

संबंधित बातम्या :

एपीएमसी मार्केटमधील व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह, कामगार, वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण

लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद, मजूर हैद्राबादहून नागपुरात चालत, यूपीच्या कुटुंबाची 97 तास पायपीट

कोरोना पाठोपाठ सारीचंही संकट, अहमदनगरसह जालना आणि नाशिकमध्येही फैलाव

ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.
मनसे, ठाकरे गट युतीची चर्चा, घडामोडींना वेग; दोन बड्या नेत्यांची भेट
मनसे, ठाकरे गट युतीची चर्चा, घडामोडींना वेग; दोन बड्या नेत्यांची भेट.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन.
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका.
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका.
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.