अंगणवाडी सुपरवायझरकडून पोषण आहाराची अफरातफर, डोंबिवलीत धान्याच्या टेम्पोसह महिला रंगेहाथ

गरीब गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या धान्याचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे.

अंगणवाडी सुपरवायझरकडून पोषण आहाराची अफरातफर, डोंबिवलीत धान्याच्या टेम्पोसह महिला रंगेहाथ
Follow us
| Updated on: Sep 13, 2020 | 5:53 PM

डोंबिवली : गरीब गरोदर महिला आणि लहान मुलांसाठी पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत (Appropriation In Supplementary Food) मिळणाऱ्या धान्याचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. अपहार करणाऱ्या अंगणवाडी सुपरवायझर महिलेला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला किती वर्षांपासून हा अपहार करीत होती. हे धान्य कोणाला विकत होती. याचा शोध आता पोलीस घेत आहेत (Appropriation In Supplementary Food).

मसूरडाळ, चनाडाळ, गव्हू, तांदूळ, मीठ, हळद, गोडेतेल, लाल मिरची पावडर हे धान्य सरकारच्या पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि लहान मुलांना पुरविले जाते. लॉकडाऊनमध्ये नागरिकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली होती. जे गरीब आहेत, त्यांची स्थिती अत्यंत वाईट होती. आता अनलॉक सुरु आहे. मात्र, त्यातही गरीबांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला जात आहे.

हा प्रकार दुसरा तिसरा कोणी नाही तर अंगणवाडी सुपरवायझर महिला सुषमा घुगे ही करीत होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सुषमावर संशय आला. यासंदर्भात बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी मानपाडा पोलिसांशी संपर्क साधला. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस मधुकरी सुरेश डांबरे यांच्या पथकाने सुषमा घुगेच्या मागे सापळा रचला. त्या घरातून निघाल्यापासून पोलिसांचं पथक त्यांचा पाठलाग करत होते. अखेर दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी धान्याने भरलेला टेम्पोसह सुषमा घुगेला रंगेहाथ पकडलं (Appropriation In Supplementary Food).

या संदर्भात सुषमाची कसून चौकशी केली असता, तिच्याकडे यावर काही ठोस उत्तर नव्हते. सरकारकडून येणारे हे धान्य गरीबांना न देता त्याचा अपहार केल्याप्रकरणी सुषमाला अटक करण्यात आली आहे. सुषमाने आतापर्यंत किती धान्यचा अपहार केला? ते कोणाला विकले? त्यात अन्य कोण सहभागी आहे?, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

Appropriation In Supplementary Food

संबंधित बातम्या :

सोन साखळीसाठी 20 वर्षीय तरुणाचा खून, मृतदेह खाडीत फेकला, तिघांना अटक

वयोवृद्ध दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात, कोरोना चाचणीसाठी घरी गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर थरारक दृश्य

नागपुरात ऑनलाईन देहविक्रीचा व्यवसाय, दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.