15 नोव्हेंबरपर्यंत पीकविमा मंजूर करा अन्यथा… शिवसेना नेत्या भावना गवळी आक्रमक

शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार भावना गवळी यांनी वाशिम जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली.

15 नोव्हेंबरपर्यंत पीकविमा मंजूर करा अन्यथा... शिवसेना नेत्या भावना गवळी आक्रमक
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 10:03 AM

वाशिम : जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचं नुकसान केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार भावना गवळी (Bhavna Gawli) यांनी जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे यावेळी त्यांच्या निदर्शनास आले.

यावेळी खासदार गवळी म्हणाल्या की, राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणारच आहे. तसेच शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमादेखील काढला आहे, मात्र जिल्ह्यात पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत.

शेतकऱ्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत पीकविमा मंजूर करून द्या, अन्यथा 15 नोव्हेंबरला जिल्ह्यातील पीकविमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसैनिक मोर्चा काढतील आणि कार्यालयाला घेराव घालणार आहेत, असा इशारा खासदार गवळी यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार नाही तोवर स्वस्थ बसणार नाही, असेही गवळी यांनी सांगितले. जिल्ह्यातील वारा, अनसिंग, कुभी या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी करण्यासाठी त्या गेल्या होत्या.

दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना 10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तसेच राज्याचे केंद्राकडे 38 हजार कोटी थकीत असून केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं म्हटलं आहे. दिवाळीपर्यंत ही मदत देऊ. सणासुदीत बळीराजाच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कसं असणार 10 हजार कोटींचं पॅकेज?

1. शेतीपिकासाठी : जिरायत व बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रतिहेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल) 2. फळपिकांसाठी : फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रतिहेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करम्यात येईल) 3. मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल 4. रस्ते पूल – 2635 कोटी 5. नगर विकास – 300 कोटी 6. महावितरण उर्जा – 239 कोटी 7. जलसंपदा – 102 कोटी 8. ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा – 1000 कोटी 9. कृषी शेती घरांसाठी – 5500 कोटी

संबंधित बातम्या

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींंचं पॅकेज जाहीर, पण मदत नेमकी कशी मिळणार?

शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत पुरेशी नाही, अजून निधी जाहीर करा – पंकजा मुंडे

(Approve crop insurance till November 15 otherwise Will protest against crop insurance company : ShivSena MP Bhavana Gawali)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.