PHOTO : ‘मातोश्री’जवळ चहावाल्याची प्रकृती बिघडल्याने खबरदारीसाठी परिसर सील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या आसपासचा संपूर्ण (Area around Matoshree sealed) परिसर सील करण्यात आला आहे.
‘मातोश्री’ परिसरात असलेल्या चहा विक्रेत्याला प्रकृतीची तक्रार जाणवू लागल्याने खबरदारीची पावलं उचलण्यात आली आहेत.
Follow us

वांद्रे पूर्व येथील कलानगर भागात ‘मातोश्री’ हे उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान आहे.
‘मातोश्री’पासून हाकेच्या अंतरावर चहाची टपरी आहे. तिथल्या चहा विक्रेत्याला प्रकृतीचा त्रास झाल्याने संपूर्ण भागात प्रवेश मनाई करण्यात आली आहे.
या चहा विक्रेत्याला ‘कोरोना’शी संबंधित त्रास आहे का, हे अद्याप स्पष्ट नसल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
कलानगर हा ‘एच पूर्व’ विभागामध्ये मोडतो. 5 एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या आकड्यावरुन हा विभाग गंभीर प्रकारात मोडतो.
इथे आतापर्यंत 25 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानासोबतच ‘वर्षा’ हे सरकारी निवासस्थानही गंभीर विभागामध्ये मोडते.
मुंबई महापालिकेने सर्वाधिक ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळलेले मुंबईतील विभाग ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर केले आहेत. ‘जी दक्षिण’ आणि ‘ई’ हे वॉर्ड अतिगंभीर प्रकारात मोडतात.