Migrant Labors | पुणे जिल्ह्यात 39 विश्रांतीगृहांची व्यवस्था, स्थलांतरित मजुरांना आधार

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होत आहे. ऊन, वारा, पावसात रात्रंदिवस हे स्थलांतर सुरु आहे.

Migrant Labors | पुणे जिल्ह्यात 39 विश्रांतीगृहांची व्यवस्था, स्थलांतरित मजुरांना आधार
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 11:47 PM

पुणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात (Pune Migrant Labors ) 39 विश्रांतीगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महामार्गावरुन स्थलांतरित मजुरांसाठी विश्रांतीगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. या विश्रांतीगृहात आतापर्यंत 2 हजार 212 स्थलांतरित मजुरांनी आसरा घेतला. पुणे-बंगळुरु, पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई या महामार्गांवर विश्रांतीगृह आहेत. या विश्रांतीगृहात नाष्ता, जेवण आणि शौचालयाची (Pune Migrant Labors ) सुविधा उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील 13 पैकी 11 तालुक्यात आतापर्यंत विश्रांतीगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यात दोन विश्रांतीगृह, बारामती एक, भोरमध्ये 3, दौंडमध्ये 7, हवेलीत 3, इंदापूरला दोन विश्रांतीगृह आहेत. तर जुन्नर एक, खेड येथे चार, मावळ येथे आठ, पुरंदर येथे एक आणि शिरुरला सात विश्रांतीगृह आहेत.

या विश्रांतीगृहांचा आतापर्यंत 2,212 स्थलांतरित मजुरांनी लाभ घेतला आहे. दौंडमध्ये 1,050, हवेलीत 118, खेडमध्ये 549, मावळमध्ये 96, शिरुरमध्ये 265 आणि पुरंदरमध्ये 70 स्थलांतरितांनी (Pune Migrant Labors) आसरा घेतला आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होत आहे. ऊन, वारा, पावसात रात्रंदिवस हे स्थलांतर सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विश्रांतीगृहाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. ठराविक अंतरावर मंगल कार्यालय, ढाबा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी सोय करण्याचे आदेश त्यांनी दिले.

या विश्रांतीगृहात मजुरांना हात धुण्याची सोय, सॅनीटायझर उपलब्ध करुन द्यावं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल, याची दक्षता घ्यावी. विश्रामगृहाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त गरजेनुसार तैनात करावा, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

तर विश्रांतीगृहात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवावी. मजुरांचा संपर्क क्रमांक, स्वाक्षरी, पत्ता रजिस्टरमध्ये नमूद करावं. याबाबतचा दैनंदिन अहवाल ग्रामपंचायतीने तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांना सादर करण्याचे निर्देश (Pune Migrant Labors) दिलेत.

संबंधित बातम्या :

Lockdown wedding : 4 पाहुणे मुलाकडचे, 4 पाहुणे मुलीकडचे, पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत विवाह सोहळा

Pune corona death | पुण्यात ‘या’ वयोगटातील तब्बल 80 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Pune Corona | पुण्यात साडे सात लाख नागरिकांची तपासणी होणार, महापालिकेचं नियोजन

भवानी पेठेत कोरोनाचा कहर, 500 च्या वर कोरोनाबाधित रुग्ण

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.