औरंगाबाद : अमेरिकेहून मागवलेल्या विमानातून मराठवाड्यात कृत्रिम पाऊस (Artificial rain aurangabad) पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ढगांचा अंदाज घेऊन क्लाऊड सीडिंग केल्यानंतर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील तीन गावात कृत्रिम पाऊस (Artificial rain aurangabad) पाडला असल्याचा दावा प्रशासनाने केलाय. हातखेडा, बेळगाव, भटाना या गावात पाऊस पडल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
9 ऑगस्ट रोजी सुरु केलेला प्रयोग फेल गेल्यानंतर अमेरिकेहून विमान मागवलं होतं. अमेरिकेचं विमान रविवारी हजर झालं. सोमवारी उड्डाण झालं नाही. मंगळवारी उड्डाण झालं. सोलापूर आणि मराठवाडा परिसरात विमान फिरलं. या विमानाने जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमाभागात पाऊस पाडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनीही पाऊस पडला असल्याचं सांगितलंय. अंबड तालुक्यातील कोडगाव, सुखापुरी, लखमापुरी, झिरपी आणि अंबड शहरात किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडल्याची माहिती आहे. घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावात सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटे ते साडे पाचच्या दरम्यान हलक्या सरी कोसळल्या. सुखापुरी आणि लखमापुरी गाव परिसरात विमान पाहिल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
मराठवाड्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा
मराठवाड्याला सध्या नितांत पावसाची गरज आहे. यावर्षी मराठवाड्यात 50 टक्के सुद्धा पाऊस झालेला नाही.
मराठवाड्यात सरासरीच्या 50 टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठवाड्यातील धरणाची आजची स्थिती
अत्यल्प पाऊस आणि धरणात शून्य टक्क्यांपेक्षाही अत्यंत कमी असलेला पाणीसाठा यामुळे मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. सध्या वातावरण ढगाळ आणि पावसाची थोडी थोडी भूरभूर असल्यामुळे दाहकता जाणवत नसली तरी पावसाने उघडीप दिल्यानंतर मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता सुरू होणार आहे. पण कृत्रिम पावसामुळे (Artificial rain aurangabad) ही दाहकता कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्याला कितप यश येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.