असेल हिम्मत लढणाऱ्यांची, पाच वर्षांच्या अरणाचे धाडस, मलंगगड केला सर!

गिर्यारोहण म्हटले की अनेकांचे पाय थरथर कापतात. मात्र, अवघ्या पाच वर्षांच्या अरणा इप्परला हे सहज जमतं. इतकंच नाही, तर तिनं अवघड असा मलंगगड सर केलाय.

असेल हिम्मत लढणाऱ्यांची, पाच वर्षांच्या अरणाचे धाडस, मलंगगड केला सर!
नाशिकच्या अरणा इप्परने मलंगगड सर केला.
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 11:22 AM

नाशिकः गिर्यारोहण म्हटले की अनेकांचे पाय थरथर कापतात. मात्र, अवघ्या पाच वर्षांच्या अरणा इप्परला हे सहज जमतं. इतकंच नाही, तर तिनं अवघड असा मलंगगड सर केलाय.

अरणा इप्पर… वयाच्या पाचव्या वर्षी तिने इतिहास रचलाय…तिने चक्क मलंगगड सर केलाय…विशेष म्हणजे त्यात रॅपलिंग आणि पोलक्रॉसिंग केलंय…भल्या – भल्यांची अशा साहसी ठिकाणी हिम्मत होत नाही, अशा ठिकाणी अरणाने अगदी सहजतेने टप्पा पार केलाय. तसं तिचं हे तिसरं ट्रेकिंग आहे. वयाच्या पाचव्या वर्षी तिने मलंगगड सर करणे काही साधी बाब नाही. कमी वयात तिनं केलेला हा धाडसी ट्रेक अनेकांसाठी आश्चर्याची बाब आहे. अरणा तशी घरात खोडकर आहेच, पण मुलीचा हे साहस पाहून कुटुंबाला आनंद झालाय. अरणानं मलंग गड सर केल्याने सर्वाधिक आनंद तिच्या आई-बाबांना झालाय. अरणानं केलेल्या ट्रेकिंगचे सर्वत्र कौतुक होत आहे. कमी वयात इतका मोठा गड सर करणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळे भविष्यात अरणा आणखी नवनवे ट्रेकिंग करून विक्रम करणार यात शंका नाही.

असा आहे मलंगगड…

मलंगगड माथेरानच्या डोंगरांगामध्ये आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची तीन हजार दोनशे फूट उंच आहे. विशेष म्हणजे येथे एक किल्लाही आहे. कल्याणच्या दक्षिणेपासून अवघ्या सोळा किलोमीटवर हो बांधला आहे. पनवेल वरुण वावंजे गावपासून हा किल्ला दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. बदलापूरच्या नैर्ऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा, उरण नैर्ऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला होता.

असेही जाता येते गडावर…

कल्याणहून सकाळी अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. पनवेल वरुण वावंजे गावांसाठीही बसची सोय आहे. वावंजे गावपासून दोन किलोमीटर अंतरावर गडाचा पायथा आहे. तिथपर्यंत रिक्षाची सोय आहे. गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिद्ध हाजीमलंग दर्गा आहे. तिथपर्यंत पायऱ्या आहेत. वाटेत दुकाने आहेत. एक देवीचे मोठे मंदिर आणि शंकराचे लहान देऊळ आहे. वरच्या या दर्ग्यापर्यंत भविकांची भरपूर वर्दळ असते.

अनेक पायवाटाही…

हाजीमलंग दर्ग्याच्या अलीकडे दुकानांच्या रांगेतून एक बोळ उजवीकडे जातो. तेथे घरे आहेत आणि विहीरही आहे. वाट समोरच्या डोंगराला लागून उजवीकडून वर चढायला लागते. पधंरा वीस मिनिटांत पहिला चढ पार करून वरच्या उभ्या कड्यापाशी पोहचता येते. तसेच श्री मलंगगडाच्या दक्षिणेच्या समोरील बाजूस पनवेल तालुक्यातील (शिरवली गाव) आहे. त्या गावासमोर एक आदिवासी कोंडपवाडी आहे त्या ठिकाणाहून एक सोपी पायवाट आहे. पूर्वी रोजी रोटी साठी गावकरी गडावर याच वाटेतून जात असत.

इतर बातम्याः

VIDEO | कारला धडकून बाईकसह तरुण गेला फरफटत, नाशकात भीषण अपघात, संतप्त जमावाने गाडी पेटवली

‘सीएचएम’सह सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा सुरू

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.