नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी “देशातील सर्व जनतेला कोरोना लस मोफत मिळाली पाहिजे. सर्व देशवासियांचा तो अधिकार आहे. प्रत्येक नागरिक कोरोनामुळे त्रस्त आहे, यामुळे मोफत कोरोना लस मिळणे गरजे आहे.” असं म्हटलं आहे. जेव्हा कोरोनावर लस उपलब्ध होईल तेव्हा त्याची किमंत किती असेल ते पाहिले जाईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. (Arvind Kejriwal said free corona vaccine is right of each Indian citizen)
अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते आज शास्त्रीनगर-सीलमपूर उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त केजरीवालांनी दिल्लीतील जनतेला शुभेच्छा दिल्या. शास्त्रीनगर आणि सीलमपूर उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे आईएसबीटी ते उत्तर प्रदेश सीमेवर जाण्याचा मार्ग सुकर होईल, असं केजरीवाल म्हणाले. यापूर्वी येथून जाताना जनतेला त्रास सहन करावा लागत होता मात्र, आता त्यातून सुटका होणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले.
शास्त्री नगर आणि सीलमपूर येथील उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या पीडब्ल्यूडी विभागाचे केजरीवालांनी कौतुक केले. 303 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असणाऱ्या पुलाचे काम 250 कोटी रुपयांमध्ये पूर्ण करण्यात आले. दिल्लीचे 53 कोटी रुपये वाचवण्यात आल्याची माहिती केजरीवालांनी दिली.
कांद्याच्या वाढत्या किमंतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्हाला काम करण्याची गरज आहे. आम्ही आवश्यक ते प्रयत्न करु, असं केजरीवाल म्हणाले. देशामध्ये सर्वत्र कांद्याच्या किमती वाढत आहेत. कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रसरकारने हस्तक्षेप करणं गरजेचे आहे. तरच देशातील कांदा दर नियंत्रित होतील असं केजरीवालंनी म्हटले.
शिक्षणाला आम्ही आजपर्यंत प्राथमिकता दिली आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी जे करता येईल ते सरकार म्हणून करु, असं केजरीवाल म्हणाले.
संबंधित बातम्या:
यूपी सरकारनं दोषींना कठोर शिक्षा द्यावी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
Exam Controversy | कोरोनाकाळात परीक्षांवरुन राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आक्रमक
(Arvind Kejriwal said free corona vaccine is right of each Indian citizen)