गुपित उलगडलं… म्हणून मुंबई-पुण्यात 'दादा, मी प्रेग्नंट आहे'चे पोस्टर लावले होते!
मुंबई : मुंबई-पुण्यात झळकलेल्या ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरचं गुपित उलगडलं आहे. हे पोस्टर लावण्यामागचं कारण समोर आलं आहे. हे पोस्टर का लावले असावेत, यामागे काय कारण असावे, याचे अनेक अंदाज लढवले जात होते. कुणी म्हणत होतं, मस्करीत हे पोस्टर लावले असावे, तर कुणी म्हणत होते, मुंबई-पुणे-मुंबई सिनेमच्या प्रसिद्धीसाठी ही क्लृप्ती वापरण्यात आली असावी. पण […]
मुंबई : मुंबई-पुण्यात झळकलेल्या ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरचं गुपित उलगडलं आहे. हे पोस्टर लावण्यामागचं कारण समोर आलं आहे. हे पोस्टर का लावले असावेत, यामागे काय कारण असावे, याचे अनेक अंदाज लढवले जात होते. कुणी म्हणत होतं, मस्करीत हे पोस्टर लावले असावे, तर कुणी म्हणत होते, मुंबई-पुणे-मुंबई सिनेमच्या प्रसिद्धीसाठी ही क्लृप्ती वापरण्यात आली असावी. पण अखेर या पोस्टरमागचे कारण समोर आले आहे. मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिने सोशल मीडियावर ‘एक गुड न्यूज’ आहे अशी पोस्ट शेअर केली होती. दादरच्या प्रभादेवी परिसरातही ‘दादा, मी प्रेग्नन्ट आहे.’ असे होर्डिंगही लावण्यात आले होते. अनेकांनी याबाबत तर्कवितर्क काढले आणि अखेर हे गुपित उलगडले. हे पोस्टर उमेश कामतच्या आगामी नाटकाची प्रसिद्धी आहे. नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शन्स एक नवंकोरं नाटक घेऊन येत आहे. ‘दादा,एक गुड न्यूज आहे.’ असे या नाटकाचे नाव आहे. या नाटकाचे पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर रिलीज करण्यात आले. बहीण भावाच्या प्रेमळ आणि विश्वासू नात्याची गोष्ट आपल्याला ह्या नाटकाद्वारे पाहायला मिळेल. उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही भावा बहिणीची जोडी आपल्याला या नाटकात दिसणार आहे. उमेश या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत असून, ऋता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे.
तर ही आहे गुड न्यूज! आमची पहिली निर्मिती. खूप मनापासून, प्रेमाने जपलेली आणि वाढवलेली ही पहिली कलाकृती लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आजपर्यंत अभिनेते म्हणून तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंत, तसंच आमच्या या नव्या प्रवासाला सुध्दा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मिळू देत. pic.twitter.com/Azmn46Cbll
— Priya Bapat (@bapat_priya) December 3, 2018
सोनल प्रोडक्शन निर्मित आणि कल्याणी पाठारे लिखित ह्या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केली असून, नंदू कदम ह्या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीताची धुरा ओंकार पाटील यांनी सांभाळली असून, आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे ह्या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे. संबंधित बातम्या : ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरनंतर आता ‘शी इज मिसिंग’ ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरचा अर्थ समजला?