कोरोना नियंत्रणासाठी राज्यात 22,118 खोल्यांची सज्जता, 55,707 खाटांची सोय : अशोक चव्हाण

कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल 22 हजार 118 खोल्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत (Ashok Chavan on arrangements to prevent Corona).

कोरोना नियंत्रणासाठी राज्यात 22,118 खोल्यांची सज्जता, 55,707 खाटांची सोय : अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Mar 25, 2020 | 6:14 PM

मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल 22 हजार 118 खोल्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत (Ashok Chavan on arrangements to prevent Corona). या खोल्यांमध्ये जवळपास 55 हजार 707 खाटांची सोय होऊ शकणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, “कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. मात्र, गरज भासलीच तर राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील 22 हजार 118 खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विश्रामगृहे, वसतीगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे.”

या ठिकाणी वीज, पाणी अशा सुविधा देखील उपलब्ध असतील. या खोल्यांचा वापर विलगीकरण आणि तात्पुरत्या स्वरुपातील रूग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपात्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापर देखील सुरू केला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हे कर्मचारी हवे त्यावेळी उपलब्ध असतील, अशीही माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 45 पुणे – 19 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 9 कल्याण – 5 नवी मुंबई – 5 नागपूर – 4 यवतमाळ – 4 अहमदनगर – 3 ठाणे – 3 सातारा – 2 पनवेल – 1 उल्हासनगर – 1 वसई विरार – 1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1

एकूण 116 (Corona Cases in Maharashtra rises)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबई (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई (1) – 19 मार्च उल्हासनगर (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च मुंबई (1) – 23 मार्च कल्याण (1) – 23 मार्च ठाणे (1) – 23 मार्च सातारा (2) – 23 मार्च सांगली (4) – 23 मार्च पुणे (3) – 24 मार्च अहमदनगर (1) – 24 मार्च सांगली (5) – 25 मार्च मुंबई (4) – 25 मार्च

एकूण – 116 कोरोनाबाधित रुग्ण

संबंधित बातम्या :

आदिवासी भागात झाडांच्या पानांचे मास्क, कोरोना रोखण्यासाठी खबरदारी

कांदा पुन्हा शंभरी गाठणार? लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव अनिश्चित काळासाठी बंद

VIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत

Ashok Chavan on arrangements to prevent Corona

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.