Ashram | बॉबी देओलची वेब सीरीज वादात, करणी सेनेकडून प्रकाश झांना कायदेशीर नोटीस!

‘आश्रम’ या वेब सीरीजच्या (Ashram) माध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे.

Ashram | बॉबी देओलची वेब सीरीज वादात, करणी सेनेकडून प्रकाश झांना कायदेशीर नोटीस!
काशीपुरवाल्या निराला बाबांची ही कथा आणखी पुढे सरकणार आहे. आता या मालिकेचा तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 2:15 PM

मुंबई : ‘आश्रम’ या वेब सीरीजच्या (Ashram) माध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला. त्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, प्रकाश झा यांची ही वेब सीरीज प्रदर्शनापूर्वीच वादात अडकली आहे (Ashram Web series controversy). धार्मिक भावना दुखावल्याचे म्हणत, करणी सेनेने प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे (Ashram Web series controversy karni sena sent legal notice to Prakash jha).

करणी सेनेच्या राज्य संघटनेचे सरचिटणीस सुरजित सिंह यांनी प्रकाश झांना ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. प्रकाश झा व्यतिरिक्त,  जिथे ही वेब सीरीज प्रदर्शित करण्यात आली त्या ‘एमएक्स प्लेयर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला देखील कायदेशीर नोटीस पाठवली गेली आहे. ‘या वेब सीरीजमधून धार्मिक परंपरा, आश्रम धर्म, प्राचीन सांस्कृतिक परंपरा यांना लक्ष्य करण्यात आले आहे’, असे करणी सेनेने आपल्या या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले आहे.

वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी

‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला असला, तरी आता दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनावर मात्र संकट कोसळले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, करणी सेनेने यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.(Ashram Web series controversy karni sena sent legal notice to Prakash jha)

करणी सेनेचे सरचिटणीस सुरजित सिंह यांच्या वकिलाने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, ‘प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आश्रम-चॅप्टर-2- द डार्क साइड’ नावाच्या वेब सीरीजमुळे लोकांच्या भावनांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही वेब सीरीज येणाऱ्या तरुण पिढीमध्ये हिंदू धर्माबद्दल नकारात्मकता पसरवणारी ठरणार आहे.’

तसेच वेब सीरीजच्या अधिकृत ट्रेलरमध्ये दर्शविलेले वैशिष्ट्य कोणत्याही व्यक्तिमत्वाला लक्ष्य करत नाही. तर, या ट्रेलरमधून पुरातन परंपरा, प्रथा, हिंदू संस्कृती, आश्रम धर्म यांना निशाणा बनवले जात आहे. ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत’, असेही या नोटीसमध्ये म्हणण्यात आले आहे.(Ashram Web series controversy karni sena sent legal notice to Prakash jha)

(Ashram Web series controversy karni sena sent legal notice to Prakash jha)

धार्मिक भावनांचा अपमान

सुरजितच्या वकिलांनी आपल्या नोटीसमध्ये लिहिले की, ‘आश्रम वेब सीरिजच्या पहिल्या भागात हिंदू चालीरिती आणि आश्रम व्यवस्थेची प्रतिमा डागाळणारी बरीच आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली होती. आता ‘आश्रम 2’ वेब सीरिजच्या अधिकृत ट्रेलरमध्ये देखील आश्रमातील प्रतिमा मलीन करत हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे. माझ्या अशिलाने वारंवार हिंदू धर्माची विटंबना करण्याच्या प्रयत्नांचा निषेध केला. त्यामुळे आता या वेब सीरीजचा अधिकृत ट्रेलर हटवून, प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी.’

‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल व्यतिरिक्त अदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 11 नोव्हेंबर रोजी ‘आश्रम-चॅप्टर-2- द डार्क साइड’ एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे.

(Ashram Web series controversy karni sena sent legal notice to Prakash jha)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.