‘निसर्ग’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या दापोली-मंडणगडसाठी 25 कोटींची मदत

निसर्ग चक्रीवादळाचा फार मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला (Nisarga Cyclone Ratnagiri) आहे.

'निसर्ग' चक्रीवादळाचा फटका बसलेल्या दापोली-मंडणगडसाठी 25 कोटींची मदत
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 8:19 AM

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा फार मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला (Nisarga Cyclone Ratnagiri) आहे. येत्या आठ दिवसांच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मदत मिळणाऱ्या वादळग्रस्तांच्या लाभार्थ्यांची यादी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते तालुक्यातील गावाच्या सरपंचांना देण्यात आली (Nisarga Cyclone Ratnagiri) आहे.

निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री अस्लम शेख हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दापोली आणि मंडणगड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या 25 कोटी निधीच्या वाटपासाठी लाभार्थ्यांच्या यादीचे वितरण दोन्ही तालुक्यातील सरपंचांना केले.

शेख यांनी वादळग्रस्तांना भेट देऊन राज्य शासन वादळग्रस्तांच्या पाठीशी उभे असल्याचे नमूद केले. नुकसान भरपाईचा निधी तातडीने लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रशासनास सूचना दिल्या.

यावेळी शेख यांनी श्रीवर्धन तालुक्यातील कोळंबी संवर्धन प्रकल्पाच्या नुकसानीची, जीवना बंदराची हानी, भरडखोल आदी ठिकाणीच्या हानीची पाहणी केली. तसेच तेथील मच्छीमारांशी चर्चा केली.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार भाई जगताप, आमदार योगेश कदम, आमदार अनिकेत तटकरे, माजी मंत्री रामदास कदम, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांकडून वादळग्रस्त रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा आढावा, 100 कोटींची एकत्रित मदत जाहीर

रत्नागिरी जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका, 27 हजार घरांची पडझड, आंबा, काजू, पोफळीच्या बागांचेही नुकसान

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.