Photos : अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर जीवघेणा चाकू हल्ला, चेहऱ्यावरही वार करण्याचा प्रयत्न
चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला झाला आहे. यानंतर माल्वीला मुंबईतील अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Follow us
चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला झाला आहे. यानंतर माल्वीला मुंबईतील अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माल्वीवर काल (26 ऑक्टोबर) रात्री एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला. हल्लेखोराने माल्वीच्या चेहऱ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, माल्वीने हा चेहऱ्यासमोर केल्याने हे वार हातावर लागले. यामुळे चेहरा वाचला मात्र हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. माल्वीवर उपचार सुरु असून सध्या ती धोक्याच्या बाहेर आहे.
माल्वीवर हल्ला करणाऱ्याविरुद्ध मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आतापर्यंत माल्वीवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटलेली नाही.
माल्वीने हिंदी, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ती कलर्स टीव्हीवरील शो उडानमध्ये देखील दिसली होती.
यासोबतच अनेक जाहिरातींमध्येही ती दिसली आहे. ती Katie कॉस्मेटिक्सची ब्रँड अॅम्बेसिडर देखील आहे.