Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरासमोर दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना जाब विचारला, कल्याणमध्ये व्यावसायिकावर तलवारीने वार

घरासमोर शिवीगाळ कोणाला करतो, याचा जाब विचारणाऱ्या व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे

घरासमोर दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना जाब विचारला, कल्याणमध्ये व्यावसायिकावर तलवारीने वार
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 4:56 PM

कल्याण : घरासमोर शिवीगाळ कोणाला करतो, याचा जाब विचारणाऱ्या व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला (Attack On Businessman ) केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. त्याशिवाय घरोसमारे उभी असलेल्या चार चाकी वाहनाची तोडफोडही करण्यात आली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत (Attack On Businessman).

काल रात्री 8 वाजताच्या सुमारास कल्याणजवळील वडवली परिसरात राहणारे नयन पाटील त्यांच्या घरी होते. घरासमोर दोन ते तीन जण दारु पिऊन धिंगाणा घालत होते. त्यांचा आवाज ऐकून नयन घराबाहेर पडले. धिंगाणा घालणारे तरुण हे ओळखीचे असल्याने त्यांनी त्या तरुणांना तिथून जाण्यास सांगितले. याआधीही नयन यांचे धिंगाणा घालणाऱ्या तरुणांसोबत वाद झाले होते.

मात्र, काल रात्री नयन यांनी या तरुणांना फक्त घरासमोरुन जाण्यास सांगितले. त्यावर या तरुणांनी नयन यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा शीवीगा का करता असा जाब नयन यांनी विचारला. त्याचा या तरुणांना इतका राग आला की, त्यांनी नयनवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात नयन पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी रवी पाटील, ऋषी भोईर आणि इतर दोन तरुणांच्या विरोधात प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Attack On Businessman

संबंधित बातम्या :

मंदिरात प्रवेशबंदी असतानाही दानपेटीवर चोरट्याचा डल्ला, चोरी सीसीटीव्हीत कैद

स्वस्तात घरं, बंगले बांधून देण्याचे आमिष, नवी मुंबईत नागरिकांची 20 लाखांची फसवणूक

विवाहित महिलेची गळा आवळून हत्या करत मृतदेह विहिरीत फेकला, प्रियकराला 24 तासात अटक

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.