मॉर्निंग वॉक करताना मनविसेच्या शहराध्यक्षावर तलवारीने हल्ला; अंबरनाथ हादरले

मनसेच्या विद्यार्थी सेनेचे उल्हासनगर शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर आज अंबरनाथमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला.

मॉर्निंग वॉक करताना मनविसेच्या शहराध्यक्षावर तलवारीने हल्ला; अंबरनाथ हादरले
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 8:08 PM

उल्हासनगर : मनसेच्या विद्यार्थी सेनेचे उल्हासनगर शहराध्यक्ष मनोज शेलार (Attack On MNS Vidyarthi Sena City President) यांच्यावर आज अंबरनाथमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेलार हे बालंबाल बचावले असले, तरी त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे (Attack On MNS Vidyarthi Sena City President).

मनोज शेलार हे दररोज सकाळी अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरातील गोविंद पूल भागात मॉर्निंग वॉकसाठी जातात. आज सकाळी ते मॉर्निंगवॉक करत असताना त्यांच्या पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी शेलार यांच्या मानेवर तलवारीने घाव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूचे लोक ओरडल्याने शेलार सतर्क झाले आणि त्यांनी हात मधे घातल्याने माने ऐवजी त्यांच्या हाताला जखम झाली. यावेळी तिथल्या लोकांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोर तलवारीचा धाक दाखवत पळून गेले.

हे हल्लेखोर दोन ते तीन दिवसांपासून आपल्या मागावर असल्याची आणि एकदा त्यांनी आपल्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवल्याची माहिती शेलार यांनी पोलिसांना दिली आहे. तसेच, आपण उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण मंडळ आणि मालमत्ता विभागाचे अनेक घोटाळे बाहेर काढत असल्याने उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा या हल्ल्यामागे हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

या हल्ल्याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी कलम 307 अन्वये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही आणि आणि अन्य बाबींच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरु असल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी दिली आहे.

Attack On MNS Vidyarthi Sena City President

संबंधित बातम्या :

पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, घराजवळ मध्यरात्री थरारक हल्ला

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.