भ्रष्ट कारभारावर नाराजी व्यक्त करीत इसमाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात

चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी कोपर खैरणे विभाग कार्यालयात ठिय्या मांडला होता. काही राजकीय व्यक्ती पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्यांना लुटत असल्याचा आरोप यावेळी चव्हाण यांनी केला होता. (Attempt of self-immolation of a young man expressing displeasure over corrupt management in navi mumbai)

भ्रष्ट कारभारावर नाराजी व्यक्त करीत इसमाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात
भ्रष्ट कारभारावर नाराजी व्यक्त करीत इसमाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 7:35 PM

नवी मुंबई : महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत एका व्यक्तीने पालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे उपस्थित पोलिसांनी तात्काळ धाव घेत या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. खोट्या तक्रारी करून पैसे लाटणाऱ्यांना पालिका अधिकारी देखील साथ देत असल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे. सीबीडी येथील पालिका मुख्यालयाबाहेर मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. (Attempt of self-immolation of a young man expressing displeasure over corrupt management in navi mumbai)

विभाग अधिकारीही तक्रारीकडे करीत होते

योगेश चव्हाण असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. चव्हाण हे घणसोली येथे कुटुंबासोबत राहतात. चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी कोपर खैरणे विभाग कार्यालयात ठिय्या मांडला होता. काही राजकीय व्यक्ती पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्यांना लुटत असल्याचा आरोप यावेळी चव्हाण यांनी केला होता. त्यामुळे खोट्या तक्रारदारांना प्रशासनाने थारा देऊ नये अशी त्यांनी मागणी केली होती. परंतु विभाग अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत प्रतिसाद देण्याचे टाळले. शिवाय त्यानंतर देखील एकाच व्यक्ती विरोधात अधिकाधिक तक्रार अर्ज करून त्रास देण्याचा प्रकार सुरूच होता. त्यामुळे संतप्त झालेल्या योगेश चव्हाण यांनी मंगळवारी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे बंदोबस्तावर उपस्थित पोलीस व सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत चव्हाण यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील दुर्दैवी घटना टळली.

अतिक्रमण मुद्द्यावरुन मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप

कोपर खैरणे विभाग कार्यालयांतर्गत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा चव्हाण यांचा आरोप आहे. याबाबत त्यांनी यापूर्वी पालिका आयुक्तांसह पोलीसांना देखील निवेदन दिले होते. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात आहे, यामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक होत असल्याचे सांगत याच्या निषेधार्थ आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.  (Attempt of self-immolation of a young man expressing displeasure over corrupt management in navi mumbai)

इतर बातम्या

ठरलं! दमदार प्रोसेसर, 64MP कॅमेरासह Oneplus Nord CE 5G ‘या’ दिवशी लाँच होणार

आई नर्गिसच्या निधनाच्या तीन वर्षानंतर संजय दत्तने ऐकला होता तिचा शेवटचा संदेश, धायमोकलून रडला अभिनेता!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.