अग्रलेख लिहिणारे संजय राऊत आता कुठे गेले?, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भातखळकर आक्रमक

कोणत्याही विषयांवर अग्रलेख लिहिणारे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आता कुठे गेलेत?, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. | Atul Bhatkhalkar

अग्रलेख लिहिणारे संजय राऊत आता कुठे गेले?, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भातखळकर आक्रमक
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 10:58 AM

मुंबई :  मूळची परळीची असलेली पुणे स्थित तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणत्याही विषयांवर अग्रलेख लिहिणारे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आता कुठे गेलेत?, असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. (Atul Bhatkhalkar Criticized Sanjay Raut over Puja Chavan Suicide Case)

एम.जे. अकबरांवर अग्रलेख लिहिणारे राऊत आता का अग्रलेख लिहित नाहीत?

एम.जे. अकबरांवर अग्रलेख लिहिणारे राऊत आता का अग्रलेख लिहित नाहीत?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला. ज्या संजय राऊतांनी एम.जे. अकबरांवर आरोप झाले तेव्हा अग्रलेख लिहिले. त्यानंतर भाजपने त्यांचा राजीनामा घेतला. आता संजय राऊत कुठे गेले आहेत. हा त्यांचा दुतोंडीपणा आहे, अशी घणाघाची टीका करत राऊतांनी या प्रकरणावर बोलायला हवे” असं भातखळकर म्हणाले.

राज्यात बदमाशांचं सरकार

राज्यातील अनेक मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप होत आहे. मागील महिनाभरापूर्वी एका मंत्र्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाला. आता महिना उलटत नाही तोपर्यंतच दुसऱ्या मंत्र्यांवर आरोप होतोय. या राज्यात बदमाशांचं सरकार कार्यरत आहे, असा हल्लाबोल भातखळकर यांनी केला.

शिवसेनेची गोची

दुसरीकडे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने शिवसेनेची गोची झालीय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. पण संजय राऊत यांनी थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत बोलले पण…

शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी गाठून पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देतील, असं त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगून या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. त्यानंतर राऊत हे नाशिकच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.