Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | भाजपाचा रडीचा डाव, मैदानात येऊन लढा, अनिल परबांवरील कारवाईवर शिवसेना आमदार अंबादास दानवेंचं आव्हान!

गुरुवारी पहाटेच शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरु केली. परबांच्या बांद्रे येथील शासकीय निवासस्थानासह इतर सात ठिकाणी ईडीचे अधिकारी तपास करत आहेत.

Aurangabad | भाजपाचा रडीचा डाव, मैदानात येऊन लढा, अनिल परबांवरील कारवाईवर शिवसेना आमदार अंबादास दानवेंचं आव्हान!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 11:46 AM

औरंगाबादः राज्यातली सत्ता हातातून गेल्यामुळे भाजप सातत्याने महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मंत्र्यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न करत आहे. हा रडीचा डाव न खेळता भाजपने थेट मैदानात उतरावं, असा इशारा शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिला आहे. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी आज गुरुवारी सकाळपासूनच ईडीतर्फे छापेमारी सुरु आहे. परब यांनी दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी परब यांची चौकशी सुरु केलीआहे. मात्र केंद्रातील भाजपकडून सातत्याने सत्तेचा गैरवापर सुरू आहे, महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम बंगाल असेल या राज्यात सातत्याने ईडीच्या रेड टाकल्या जातात, काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्री आणि नेत्यांना त्रास देणं सुरू आहे, असा आरोप दानवेंनी केला आहे. मात्र शिवसेनेला अशा कारवायांनी काहीही फरक पडणार नाही, असंही दानवेंनी स्पष्ट सांगितलं.

‘जनतेच्या डोळ्यात धूळफेक’

अनिल परबांवरील कारवाईवरून शिवसेनेचे काहीही बिघडत नाही. अशा आरोपांना सामोरे जाण्यासाठी शिवसेना सक्षम आहे. भाजपनं अशा प्रकारे रडीचा डाव खेळणं, खोटे आरोप लावणं, बदनामी करण्याचे प्रकार सोडून थेट मैदानात उतरावं. अशा प्रकारे जनतेच्या डोळ्यात धूळफेक किती दिवस करणार, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

‘उद्धव ठाकरेंच्या सभेला 5 लाख लोक येणार’

येत्या 8 जून रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट सभा औरंगाबादेत आयोजित करण्यात आली आहे. या सभेला किमान पाच लाख लोक उपस्थित राहणार असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. तसंच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री काय बोलतील याची कल्पना नसून आमच्या दृष्टीने संभाजीनगर हे नाव झालेलं आहे, असंही दानवे म्हणाले.

अनिल परबांच्या घरी पहाटेच ED!

गुरुवारी पहाटेच शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरु केली. परबांच्या बांद्रे येथील शासकीय निवासस्थानासह इतर सात ठिकाणी ईडीचे अधिकारी तपास करत आहेत. दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. परब यांची सध्या चौकशी सुरु असून व्यवहारांमध्ये दोष आढळल्यास अनिल परब यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.