औरंगाबादेत भरधाव कारची तिघींना धडक, दोघींचा जागीच मृत्यू, एक महिला गंभीर जखमी
भरधाव वेगात असलेल्या कारच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
औरंगाबाद : भरधाव वेगात असलेल्या कारच्या धडकेत (Aurangabad Car Hit Women) दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. औरंगाबादेतील जालना रोडवरील धुत रुग्णाल चौकात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकाच कुटुंबातील दोन महिलांवर काळाचा घाला झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या भीषण अपघातात तुळसाबाई दामोदर गायकवाड (वय 70), आशामती (Aurangabad Car Hit Women) विष्णू गायकवाड (वय 42) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आहिल्याबाई दादाराव गायकवाड (वय 50) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या तीनही महिला जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील देवठाणा येथील रहिवासी होत्या.
हेही वाचा : स्कॉर्पिओ आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, 3 जखमी
या महिला आपल्या एका नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नासाठी औरंगाबादला आल्या होत्या. धुत हॉस्पीटल चौकात त्या रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. तेव्हा चिकलठाण्याहुन सिडको बसस्थानक चौकाकडे भरधाव वेगाने जात होती. या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सूटले आणि कारने या महिलांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तुळसाबाई गायकवाड आणि आशामती गायकवाड या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर आहिल्याबाई गायकवाड या गंभीर जखमी झाल्या.
अपघातानंतर कारचालक कारसह घटनास्थळावरुन पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तीन महिलांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तुळसाबाई गायकवाड आणि आशामती गायकवाड यांना मृत (Aurangabad Car Hit Women) घोषित केले. याप्रकरणाची नोंद औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
साताऱ्यात बोअरवेल ट्रक पलटी होऊन भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 8 जखमी
अस्थीविसर्जनाहून परतताना काळाचा घाला, यवतमाळमध्ये अपघातात सात जणांचा मृत्यू
वीकेंडला फिरायला गेलेल्या मित्रांचा कार उलटून अपघात, एकाचा मृत्यू
साखरपुड्यावरुन परतताना कार-एसटीचा अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू