औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी!

महिलेचा मृत्यू झाला, तेव्हा या महिलेचा रिपोर्ट 'कोरोना' पॉझिटिव्ह आला नव्हता, पण अंत्यविधी झाल्यानंतर रात्री 8 वाजता महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. (Aurangabad Corona Patient Lady Dies Hundreds of people gathered for Funeral)

औरंगाबादमध्ये 'कोरोना'बाधित महिलेच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी!
Follow us
| Updated on: Apr 22, 2020 | 1:29 PM

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेच्या अंत्यविधीला शंभरपेक्षा जास्त जणांची गर्दी जमल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिलेल्या सर्वांचा शोध घेण्याची डोकेदुखी प्रशासनाला झाली आहे. (Aurangabad Corona Patient Lady Dies Hundreds of people gathered for Funeral)

औरंगाबादमध्ये 76 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यविधीला शंभरपेक्षाही अधिक व्यक्ती उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. संचारबंदी आणि जमावबंदी लागू असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

विशेष म्हणजे महिलेचा मृत्यू झाला, तेव्हा या महिलेचा रिपोर्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आला नव्हता, पण अंत्यविधी झाल्यानंतर रात्री 8 वाजता महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हे 100 जण कोण होते, हे शोधून काढून त्या सर्वांची कोरोना तपासणी करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. या घटनेने आरोग्य यंत्रणांची झोप उडाली असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोनाबळींचा आकडा पाचवर जाऊन पोहोचला आहे. औरंगाबादमध्ये कोरोनामुळे कालच्या दिवसात दोघांचा मृत्यू झाला. संबंधित महिलेशिवाय 60 वर्षीय पुरुषाने आपला जीव गमावला. दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते.

औरंगाबादमध्ये कोरोनाबधितांची संख्या 35 वर पोहोचली आहे. सध्या 15 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. औरंगाबाद महापालिकेकडून कॉंटॅक्ट ट्रेसिंग केलं जात आहे.

हेही वाचा : तीन वर्षांचे बाळ ते 92 वर्षीय आजी, पुण्यात 15 जणांच्या कुटुंबाची ‘कोरोना’वर मात

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सगळीकडे कडकडीत बंद पाळला जात आहे. औषधांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. चौकाचौकात नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. (Aurangabad Corona Patient Lady Dies Hundreds of people gathered for Funeral)

औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित बाळंतीणीचे नवजात बाळ ‘कोरोना’ निगेटिव्ह

चार दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित गर्भवतीने जन्म दिलेल्या बाळाला ‘कोरोना’ची लागण झाली नसल्याचं दिलासादायक वृत्त आलं होतं. गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. तिचे नऊ महिने भरत आल्यामुळे महिलेच्या कुटुंबासह डॉक्टर-नर्स यांनाही काळजी लागली होती.

घाटी रुग्णालयात काल (शनिवार 18 एप्रिल) या महिलेची डिलेव्हरी झाली. कोरोनाबाधित महिलेने मुलीला जन्म दिला. बाळाचे ‘कोरोना’ अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागात आनंदाची लाट पसरली. पुढचे काही दिवस बाळाला आईपासून दूर ठेऊन संगोपन केलं जाणार आहे.

(Aurangabad Corona Patient Lady Dies Hundreds of people gathered for Funeral)

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.