Aurangabad Corona | औरंगाबादेत ‘कोरोना’चा कहर, शहराच्या 25 भागात 74 नवे रुग्ण
औरंगबादेत पुढील तीन दिवस मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत (Aurangabad Corona Patients found in 25 Different Areas)
औरंगाबाद : औरंगाबादेत ‘कोरोना’ रुग्णसंख्येचा पुन्हा स्फोट झाला. तब्बल 74 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 829 वर पोहोचला आहे. गेल्या 8 दिवसांत औरंगाबादमध्ये 445 रुग्ण वाढले आहेत. (Aurangabad Corona Patients found in 25 Different Areas)
औरंगाबाद शहरात सकाळी 79 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. विशेष म्हणजे हे रुग्ण शहराच्या विविध 25 भागातील आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 829 झाली असल्याची माहिती डॉ. महेश लड्डा यांनी दिली.
औरंगबादेत पुढील तीन दिवस कडकडीत बंद पाळला जाणार आहे. मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. जमावबंदी, संचारबंदी आणखी कडक केली जाणार असून वाहने बाहेर घेऊन फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
औरंगाबादमध्ये काल दिवसाच्या सुरुवातीलाचा 55 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडालेली होती. आजच्या दिवसात ही रुग्णसंख्या वाढल्याने भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबादमध्ये 15 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर कोरोनाबाधितांचा आकड्यात काहीशी वाढ होत होती. मात्र गेल्या 20 दिवसात हा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठं आवाहन प्रशासनापुढे आहे.
औरंगाबाद शहरात आज कुठे किती रुग्ण सापडले?
एन सहा, सिडको (2) बुढीलेन (1) रोशन गेट (1) संजय नगर (1) सादात नगर (1) भीमनगर, भावसिंगपुरा (2) वसुंधरा कॉलनी (1) वृंदावन कॉलनी (3) न्याय नगर (7) कैलास नगर (1) पुंडलिक नगर (8) सिल्क मील कॉलनी (6) हिमायत नगर (5) (Aurangabad Corona Patients found in 25 Different Areas) चाऊस कॉलनी (1) भवानी नगर (4) हुसेन कॉलनी (15) प्रकाश नगर (1) शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1) हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2) रहेमानिया कॉलनी (2) बायजीपुरा (5) हनुमान नगर (1) हुसेन नगर (1) अमर सोसायटी (1) न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1)
औरंगाबादमध्ये 8 दिवसांत 445 रुग्ण वाढले
तारीख | नवे रुग्ण | एकूण रुग्ण |
---|---|---|
8 मे | 99 | 477 |
9 मे | 50 | 527 |
10 मे | 31 | 558 |
11 मे | 69 | 627 |
12 मे | 26 | 653 |
13 मे | 35 | 688 |
14 मे | 62 | 751 |
15 मे | 74 | 825 |
16 मे | 58 | 900 |
17 मे | 58 | 958 |
18 मे | 59 (सकाळी 8 वाजेपर्यंत) | 1021 |
मुंबईत ‘कॅन्सर’ उपचारानंतर कोल्हापूरला परतलेल्या बालिकेला कोरोना, वडिलांनाही लागण https://t.co/9Ak25raxcX
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 15, 2020
संबंंधित बातम्या :
मुंबई, पुण्यानंतर औरंगाबाद कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, दिवसेंदिवस रुग्ण वाढतेच
(Aurangabad Corona Patients found in 25 Different Areas)