औरंगाबाद : औरंगाबादेत 59 नवे ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या एक हजाराच्या पार गेली आहे. औरंगाबादमध्ये एकूण 1021 ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. औरंगाबादच्या 21 वेगवेगळ्या भागात नव्याने रुग्ण सापडले. (Aurangabad Corona Patients found in Different Areas)
औरंगाबाद शहरात आज (17 मे) सकाळी आठ वाजेपर्यंत 59 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1021 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले. यामध्ये 27 महिला व 32 पुरुषांचा समावेश आहे.
औरंगाबाद शहरात नव्याने कुठे किती रुग्ण आढळले? (कंसात रुग्ण संख्या)
पैठण गेट, सब्जी मंडी (1)
किराडपुरा (1)
सेव्हन हिल कॉलनी (1)
एन-6 सिडको (1)
बायजीपुरा (1)
रोशन नगर (1)
न्याय नगर (3)
बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.2 (4)
हुसेन कॉलनी (4)
पुंडलिक नगर (2)
हनुमान नगर (1)
संजय नगर, गल्ली नं. पाच (1)
हिमायत बाग, एन-13 सिडको (1)
मदनी चौक (2)
सादाफ कॉलनी (1)
सिल्क मील कॉलनी (8)
मकसूद कॉलनी (6)
जुना मोंढा (11)
भवानी नगर (5)
हिमायत बाग, जलाल कॉलनी (3)
बेगमपुरा (1)
औरंगाबादमध्ये 15 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर कोरोनाबाधितांचा आकड्यात काहीशी वाढ होत होती. मात्र गेल्या 20 दिवसात हा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठं आवाहन प्रशासनापुढे आहे.
तारीख | नवे रुग्ण | एकूण रुग्ण |
---|---|---|
8 मे | 99 | 477 |
9 मे | 50 | 527 |
10 मे | 31 | 558 |
11 मे | 69 | 627 |
12 मे | 26 | 653 |
13 मे | 35 | 688 |
14 मे | 62 | 751 |
15 मे | 74 | 825 |
16 मे | 58 | 900 |
17 मे | 58 | 958 |
18 मे | 59 (सकाळी 8 वाजेपर्यंत) | 1021 |
VIDEO : Corona Special Report | चौथ्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद?https://t.co/GrEVAYFVWp
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020