Aurangabad | घरकुल योजनेचा डीपीआर केंद्र सरकारने रोखला, शिवसेना-भाजपच्या वादाचा परिणाम की तांत्रिक अडचण?

घरकुल योजनेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले आहे. त्यानुसार, ते पाठपुरावा करीत असून आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होईल, अशी अपेक्षा महापालिका अधिकाऱ्यांना आहे.

Aurangabad | घरकुल योजनेचा डीपीआर केंद्र सरकारने रोखला, शिवसेना-भाजपच्या वादाचा परिणाम की तांत्रिक अडचण?
घरकुल योजनेचा डीपीआर मंजूर होणार का?
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 6:00 AM

औरंगाबादः शहरातील घरकुल योजनेचा महापालिकेने (Aurangabad municipal corporation) तयार केलेल्या डीपीआरला केंद्र सरकारने (Central Government) मंजुरी दिली नाही. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी 31 मार्च ही अंतिम मुदत दिलेली असताना औरंगाबादमधील घरकुलांचा प्रस्ताव (Gharkul) रोखून धरण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिका आणि राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे ही योजना रखडली होती. घरकुल बांधण्यासाठी औरंगाबादमध्ये जमीनच उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. अखेर फेब्रुवारी महिन्यात ही जमीन उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतरच्या तीन आठवड्यात महापालिकेने युद्ध पातळीवर काम करून घरकुल योजनेचा डीपीआर तयार केला. आता 31 मार्च ही योजनेची अखेरची मुदत आहे. तत्पूर्वी डीपीआरला मंजुरी मिळाली तरच औरंगाबादमधील गरीबांना घरं मिळू शकतील. मात्र केंद्र सरकारने विलंब झाल्याचे कारण दाखवत या योजनेला अद्याप मंजुरी दिलेली नाही.

घरकुल योजनेचा आतापर्यंतचा घटनाक्रम-

  • केंद्र सरकारने 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्यासाठी 2016 मध्ये पंतप्रधान आवास योजना सुरु केली.
  • त्यानुसार औरंगाबाद महापालिकेने बेघर आणि गरजू नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले.
  • महापालिकेकडे 82 हजार अर्ज आले आहेत.  त्यातील 52 हजार अर्ज पात्र ठरले.
  • मागील सात वर्षांमध्ये महापालिकेला योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जागाच मिळाली नव्हती.
  • खासदार इम्तियाज जलील यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा मांडला.
  • संसदेच्या स्थायी समितीने त्याची दखल घेत संबंधिक वरिष्ठ अदिकाऱ्यांना दिल्लीला बोलावले.
  • त्यानंतर जिल्हा प्रशासनाने आधी 19 हेक्टर आणि नंतर 86 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली.
  •  त्यानंतर महापालिकेने तीन आठवड्यातच प्रकल्प सल्लागार संस्था अर्थात पीएमसी नियुक्तीची निविदा काढली.
  • पीएमसी मार्फत घरकुल बांधण्यासाठी डीपीआर तयार करण्याकरिता एजन्सी नियुक्त केली.
  • या एजन्सीने डीपीआर तयार केला. महापालिकेने तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी 15 मार्च रोजी पाठवण्यात आला आहे. 39,760 घरांच्या योजनेचा हा प्रस्ताव आहे.
  • मात्र विलंब झाल्याचे तांत्रिक कारण दाखवत केंद्र सरकारने यास अद्याप मंजुरी दिलेली नाही.

घरकुलचे राजकारण काय?

औरंगाबादच्या घरकुल योजनेच्या विलंबासाठी राजकारण्यांचे हेवे-दावे आणि प्रशासकीय उदासीनता जबाबदार असल्याचं दिसून आलं आहे. MIM च्या खासदार जलील यांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा केंद्र सरकारमधील भाजपाची ही योजना किती फोल आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर भाजपाच्या शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी राज्यात ही योजना राबवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप केला होता. मात्र संसदीय समितीच्या चौकशीनंतर वेगाने हालचाली झाल्या. मात्र पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेत हा प्रस्ताव केंद्रापर्यंत पाठवला आहे. आता घरकुल योजनेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले आहे. त्यानुसार, ते पाठपुरावा करीत असून आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होईल, अशी अपेक्षा महापालिका अधिकाऱ्यांना आहे.

इतर बातम्या-

नाशिकमध्ये पेट्रोल पंपाबाहेरच Burning car चा थरार; आगीत वाहन भस्मसात…!

एकाच चॅनेलवरुन तब्बल 99 देशांमध्ये IPL 2022 चं प्रसारण, 5 वर्षांचे हक्क खरेदी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.