औरंगाबादः शहरातील घरकुल योजनेचा महापालिकेने (Aurangabad municipal corporation) तयार केलेल्या डीपीआरला केंद्र सरकारने (Central Government) मंजुरी दिली नाही. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी 31 मार्च ही अंतिम मुदत दिलेली असताना औरंगाबादमधील घरकुलांचा प्रस्ताव (Gharkul) रोखून धरण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिका आणि राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे ही योजना रखडली होती. घरकुल बांधण्यासाठी औरंगाबादमध्ये जमीनच उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. अखेर फेब्रुवारी महिन्यात ही जमीन उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतरच्या तीन आठवड्यात महापालिकेने युद्ध पातळीवर काम करून घरकुल योजनेचा डीपीआर तयार केला. आता 31 मार्च ही योजनेची अखेरची मुदत आहे. तत्पूर्वी डीपीआरला मंजुरी मिळाली तरच औरंगाबादमधील गरीबांना घरं मिळू शकतील. मात्र केंद्र सरकारने विलंब झाल्याचे कारण दाखवत या योजनेला अद्याप मंजुरी दिलेली नाही.
औरंगाबादच्या घरकुल योजनेच्या विलंबासाठी राजकारण्यांचे हेवे-दावे आणि प्रशासकीय उदासीनता जबाबदार असल्याचं दिसून आलं आहे. MIM च्या खासदार जलील यांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा केंद्र सरकारमधील भाजपाची ही योजना किती फोल आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर भाजपाच्या शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी राज्यात ही योजना राबवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप केला होता. मात्र संसदीय समितीच्या चौकशीनंतर वेगाने हालचाली झाल्या. मात्र पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेत हा प्रस्ताव केंद्रापर्यंत पाठवला आहे. आता घरकुल योजनेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले आहे. त्यानुसार, ते पाठपुरावा करीत असून आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होईल, अशी अपेक्षा महापालिका अधिकाऱ्यांना आहे.
इतर बातम्या-