19 वर्षीय तरुणीचं प्रेरणादायी पाऊल, कॅन्सरग्रस्तांसाठी केस दान

किरणच्या मैत्रिणीला कॅन्सरचा आजार आहे. त्या आजारात किमोथेरपी घेताना तिच्या डोक्यावरील सर्व केस तिला काढावे लागले (Girl Donate Hair For Cancer Patients). आपल्या मैत्रिणीचे असे हाल पाहून तिला नेहमी दु:ख व्हायचं.

19 वर्षीय तरुणीचं प्रेरणादायी पाऊल, कॅन्सरग्रस्तांसाठी केस दान
Follow us
| Updated on: Nov 05, 2019 | 8:51 AM

औरंगाबाद : मुलींना आपलं सौंदर्य हे सर्वात प्रिय असतं. आपल्या सौंदर्यात कुठलीही कमतरता असू नये अशी त्यांची इच्छा असते, त्यात एखाद्या मुलीला आपल्या केसांवर असलेले प्रेम तर विचारायलाच नको (Aurangabad Girl Donate Hair). असं असतानादेखील औरंगाबादच्या एका 19 वर्षीय तरुणीने आपले केस कॅन्सर ग्रस्तांसाठी दान केले. किरण गीते असं या धाडसी मुलीचं नाव आहे (Girl Donate Hair For Cancer Patients).

किरण गीते ही तरुणी औरंगाबादच्या एमजीएम महाविद्यालयात पत्रकारितेचं शिक्षण घेत आहे. किरणच्या मैत्रिणीला कॅन्सरचा आजार आहे. त्या आजारात किमोथेरपी घेताना तिच्या डोक्यावरील सर्व केस तिला काढावे लागले (Girl Donate Hair For Cancer Patients). आपल्या मैत्रिणीचे असे हाल पाहून तिला नेहमी दु:ख व्हायचं. आपण यासाठी काही करू शकतो का, असा प्रश्न किरणला अनेक वेळा पडला. त्यातच एका वर्षाआधी कॅन्सर ग्रस्तांसाठी केस दान केले जाऊ शकतात अशी माहिती किरणला मिळाली. तिने आणखी माहिती काढली असता कॅन्सर ग्रस्तांसाठी काही संस्था काम करतात, याची माहिती तिला मिळाली. या संस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधला असता. या आजारामुळे ज्या व्यक्तींचे केस जातात त्यांना कृत्रिम केस लावले जाऊ शकतात, त्यासाठी केस दान केले जाऊ शकतात, असं तिला कळालं. ही माहिती मिळताच किरणने आपल्या डोक्यावरील केस दान करण्याचा निर्णय घेतला.

किरणने आपल्या आई-वडिलांना आपल्या मनातील वेदना आणि कल्पना दोन्ही सांगितल्या. कुटुंबाने किरणच्या या इच्छेचा मान ठेवला आणि तिला केस दान कापण्याची परवानगी दिली. ज्या वयात मुली आपलं सौंदर्य जपतात, त्याच वयात किरणने आपल्या सौंदर्याचा विचार न करता आपले केस दान केले. तिच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

समाजात घडणाऱ्या वाईट घटना पहिल्या, की आपल्याला बऱ्याचदा वाटतं, या जगातला चांगुलपणा संपत चाललाय का, माणसांच्या संवेदना हरवत आहेत का? पण किरण गीते सारख्या धाडसी मुली याला अपवाद ठरतात. आपल्या मैत्रिणीसाठी केस दान करून समाजाला एक वेगळा आयाम देणाऱ्या किरण गीते हिला ‘टीव्ही-9’चा सलाम.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.