भायssss दुआ में याद रखना, औरंगाबादेत भाई गॅंगच्या गुंडांचा TikTok व्हिडीओ
औरंगाबाद : नागपुरातील कुख्यात गुंडाने पोलीस व्हॅनमध्येच TikTok व्हिडीओ केल्याची घटना ताजी असतानाच, आता तसाच प्रकार औरंगाबादमध्येही समोर आला आहे. औरंगाबादेतही कुख्यात गुन्हेगाराने TikTok व्हिडीओ बनवल्याचं उघड झालं आहे. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराचा TikTok व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. शेख एजाज इब्राहिम आणि शेख इर्शाद इब्राहिम असे TikTok मध्ये दिसत असलेल्या गुन्हेगारांची नावं […]
औरंगाबाद : नागपुरातील कुख्यात गुंडाने पोलीस व्हॅनमध्येच TikTok व्हिडीओ केल्याची घटना ताजी असतानाच, आता तसाच प्रकार औरंगाबादमध्येही समोर आला आहे. औरंगाबादेतही कुख्यात गुन्हेगाराने TikTok व्हिडीओ बनवल्याचं उघड झालं आहे. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराचा TikTok व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
शेख एजाज इब्राहिम आणि शेख इर्शाद इब्राहिम असे TikTok मध्ये दिसत असलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत. धक्कादायक म्हणजे कोर्ट परिसरात हा TikTok व्हिडीओ बनवल्याचं दिसतं.
आरोपींनी टिकटॉक व्हिडिओतून रमजानच्या शुभेच्छा दिल्या. दोन- तीन महिने आत, पुन्हा बाहेर आले की आपला भाव सुरु असा उल्लेख या व्हिडीओत केल्याचं पाहायला मिळतं. दोन्ही गुन्हेगार भाई गॅंगचे म्होरके आहेत. एक खुनाच्या गुन्ह्यात तर दुसरा मोक्काअंतर्गत अटकेत आहे. जिन्सी परिसरात या गुन्हेगारांची चांगलीच दहशत आहे.
भायssss दुआ में याद रखना, औरंगाबादेत भाई गॅंगच्या गुंडांचा TikTok व्हिडीओhttps://t.co/W4NQgwArgR pic.twitter.com/90oukTY8NM
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2019
भायssss दुआ में याद रखना, औरंगाबादेत भाई गॅंगच्या गुंडांचा TikTok व्हिडीओhttps://t.co/W4NQgwArgR pic.twitter.com/N8FC2tcZp8
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2019
संबंधित बातम्या
VIDEO : नागपुरात कुख्यात गुंडाचा पोलीस व्हॅनमध्येच TikTok व्हिडीओ